shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास अभूतपूर्व प्रतिसाद


शिर्डी मतदार संघातील आम जनतेकडून शुभेच्छाचा वर्षाव 

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
नुकताच शिर्डी येथील हॉटेल साई संगम येथे शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी मतदार संघातील सर्वपक्षीय आजी माजी पदाधिकारी आणि सर्वसामान्य शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4 जानेवारी हा शिर्डी लोकसभा मतदार संघातील सामान्य जनता आणि शिवसैनिकांसाठी आनंदोत्सव कारण लोकनेते खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचा वाढदिवस असतो, जो नुकताच अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला, त्यास आम जनतेने शुभेच्छांचा वर्षाव करत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. कुठलाही बडेजाव नाही, नेहमी सामान्य जनतेत रमणारे खासदार आजही अत्यंत नम्रपणे प्रत्येकाशी संवाद साधत दिलेल्या शुभेच्छांबद्दल आदर व्यक्त करत होते. प्रचंड दांडगा जनसंपर्क असणारा असा नेता या मतदार संघात प्रत्येक गावात विकासाची कामे पोहचविण्यासाठी झटतो आहे, म्हणून आजचा अभिष्टचिंतन सोहळा नक्कीच हृदयस्पर्शी असल्याचे मत उपस्थित व्यक्त करत होते.
यावेळी खासदार होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याने मतदार संघात केलेल्या “वर्षपूर्ती”कामाचे फ्लेक्सद्वारे माहितीपट सादर करण्यात आला होता, त्यामुळे सर्वसामान्य जनता खासदार साहेबांच्या विकासकामांच्या कौशल्याचे कौतुक करताना आढळून येत होती. यावेळी मेजर महेंद्र सोनवणे यांच्या पुढाकारातून आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आले, ज्यात 300 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला. साईनाथ राहाणे यांच्या सुमधुर स्वरसंगिताच्या माध्यमातून उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत अक्षरशः माणसांची रिघ लागली होती. यादरम्यान सर्वांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी सूत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे यांनी तर शेवटी जिल्हा समन्व्यक मुकुंद सिनगर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
close