shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलहून पुण्यापर्यंत कवितेची झेप.

दादासाहेब पाटील महाविद्यालयाच्या कु. पूनम ठाकूरची फुले फेस्टिवल २०२६ साठी कविता सादरीकरणास निवड.



एरंडोल | प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथील टी. वाय. बी. ए. ची विद्यार्थिनी कु. पूनम तीर्थानंद ठाकूर हिची दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल, पुणे २०२६ मध्ये स्वरचित कविता सादर करण्यासाठी निवड झाली आहे.

कवी विजय वडवेराव यांच्या भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर या अभियानांतर्गत कु. पूनम ठाकूर हिने “माझ्या स्वप्नात आली होती सावित्री” ही कविता सादर केली. हे साहित्यिक अभियान दि. २ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे पार पडले.

फुलेंच्या विचारांना शब्दरूप; पुण्याच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एरंडोलची विद्यार्थिनी.

या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अमितदादा पाटील यांनी दिलेल्या निवेदनात,

“विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणे हे संस्थेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचे फलित आहे,”

असे नमूद करून कु. पूनम ठाकूर हिचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर तसेच प्राध्यापक व कर्मचारीवर्गानेही या यशाबद्दल तिचे विशेष कौतुक केले.

close