shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘युफोरिया 2K26’ स्नेहसंमेलन उत्साहात; ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ पुरस्कारांचे वितरण.

सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, फॅशन शोने रंगली संध्या; माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना प्रेरणा.
शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘युफोरिया 2K26’ स्नेहसंमेलन उत्साहात; ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ पुरस्कारांचे वितरण

एरंडोल : येथील शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘युफोरिया 2K26’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दि. 14 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक, कलात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण महाविद्यालय परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री होते. यावेळी सचिव सौ. रूपा शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, प्रा. जावेद शेख तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. राहुल बोरसे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘युफोरिया 2K26’ स्नेहसंमेलन उत्साहात; ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ पुरस्कारांचे वितरण

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश पाटील, प्रतीक्षा पाटील, प्रियंका सोनवणे व प्रज्ञा पाटील यांनीही सूत्रसंचालनात सहभाग घेत कार्यक्रम अधिक रंगतदार केला.

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘युफोरिया 2K26’ स्नेहसंमेलन उत्साहात; ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ पुरस्कारांचे वितरण

या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी पारंपरिक व आधुनिक नृत्य, समूह नृत्य, गायन, नाटिका, फॅशन शो आदी विविध कार्यक्रम सादर केले. रंगीबेरंगी वेशभूषा, आकर्षक संगीत आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ पुरस्कार पदवी विभागातून मुलींमधून नाजनीन सय्यद हिला, तर मुलांमधून तुषार साळुंखे याला प्रदान करण्यात आला. पदविका विभागातून आरती पाटील व महेंद्र पाटील यांना हा सन्मान देण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षणाबरोबर सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व सांगितले.

प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. गायत्री सूर्यवंशी, प्रा. योगेश्वरी लोहार, प्रा. मयुरी पाटील, प्रा. श्रद्धा शिवदे, प्रा. सुमेश पाटील, प्रा. मंगेश पाटील, प्रा. करण पावरा, प्रा. अनिता वळवी, प्रा. चंद्रभान पाटील, प्रशांत निळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जावेद शेख यांनी आभार मानले.

स्नेहसंमेलनापूर्वी महाविद्यालयात Alumni Meet घेण्यात आली असून 16 माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

close