shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल येथे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा.

एरंडोल येथे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा.

एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल येथील पंचायत समिती सभागृहात पुरवठा विभाग व तहसील कार्यालय एरंडोल यांच्या वतीने रविवारी (दि. १५ मार्च) जागतिक ग्राहक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्राहक हक्कांविषयी जनजागृती करणे आणि ग्राहक संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजीराव अहिरराव होते. यावेळी मंचावर ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या एरंडोल तालुका अध्यक्षा आरती ठाकूर, जिल्हा संघटक कैलास महाजन, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे एरंडोल तालुकाध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शिवाली देशमुख यांनी यावर्षीच्या जागतिक ग्राहक दिनाच्या संकल्पनेवर मार्गदर्शन करत ग्राहकांनी आपले हक्क जाणून घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.

प्रा. शिवाजीराव अहिरराव, आरती ठाकूर, रविंद्र पाटील व नुरुद्दीन मुल्लाजी यांनी ग्राहक हक्क संरक्षण, बाजारपेठेतील पारदर्शकता आणि फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला ग्राहक कल्याण फाउंडेशन, ग्राहक पंचायत महाराष्ट्र व अखिल भारतीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संघटनांचे पदाधिकारी, तालुक्यातील पत्रकार, रास्तभाव दुकानदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक वैराळकर, वैशाली पाचपोर, ऋषीप्रसाद पोळ व निरज सुरळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

close