shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सभासदांसाठी १० लाखांचा विमा; स्वमालकीच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावणार - विठ्ठल पवार

‘साई एम्प्लॉईज’चे कार्य कौतुकास्पद; धनश्री विखे यांच्या हस्ते शिधावाटप

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
गुढीपाडव्यानिमित्त शिर्डी येथील साई एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना नुकतेच शिधावाटप करण्यात आले. याप्रसंगी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोसायटीने नेहमीच विविध उपक्रम राबवून सभासदांचे हित जोपासले असून संस्थेची ही वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे गौरवोद्गार यावेळी धनश्री विखे यांनी काढले.
उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी मनोगतात सांगितले की, चेअरमन विठ्ठल पवार व संचालक मंडळाने सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर परिवर्तन घडवून आणले आहे. नामदार राधाकृष्ण विखे आणि डॉ. सुजय विखे यांच्या पाठबळामुळे संस्थेची होत असलेली प्रगती समाधानकारक आहे. सभासद पूर्ण ताकदीने संस्थेच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपल्या भाषणात विविध धोरणात्मक निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, सर्व संचालकांच्या विश्वासावर संस्था प्रगतीपथावर नेण्याचे काम सुरू आहे. सभासदांचा १० लाख रुपयांचा अपघाती व अनैसर्गिक मृत्यू विमा उतरवण्यात आला असून तो कुटुंबीयांना मोठा आधार ठरत आहे. सोसायटीची इमारत सध्या तांत्रिक वादात असली तरी स्वमालकीच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, बी. बी. दाभाडे, रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष संजय शिंदे, चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार पा, व्हा. चेअरमन पोपटराव भास्करराव कोते पा. संचालक महादु बापुसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., संभाजी शिवाजी तुरकणे पा., देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते पा., मिलींद यशवंत दुनबळे, तुळशिराम रावसाहेब पवार पा., रविंद्र बाबु गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., इकबाल फकिरमहंमद तांबोळी, सौ सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., रंभाजी काशिनाथ गागरे, भाऊसाहेब भानुदास लबडे पा., सचिव विलास गोरखनाथ वाणी पा. सह सचिव बाबासाहेब शंकर अनर्थे पा., सहाय्यक सह सचिव संभाजी सोपान कोते पा, यांच्यासह संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साई एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने गुढीपाडवा निमित्त शिधा वाटप करताना धनश्री विखे नगराध्यक्ष जयश्री थोरात उपनगराध्यक्ष अभय शेळके रामनवमी उत्सव अध्यक्ष संजय शिंदे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे चेअरमन विठ्ठल पवार आदी उपस्थित होते.
close