shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार का?ज्येष्ठ पत्रकार तुषार गायकवाड यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.


मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगत आहेत की, 'व्यावसायिक व घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही. केंद्र सरकारने आवश्यक ती सर्व पूर्वतयारी केली आहे. मात्र काँग्रेस अफवा पसरवत असल्याने लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभा आहेत'.

असो, देवेंद्रजींचे नाव राजा हरिश्चंद्रांनंतर एकमेव सत्य बोलणारे म्हणून घ्यायला आयटी सेल आणि ट्रोलकौरव सज्ज आहेतच. पण ही खालील बातमी बघा. सदर बातमी फ्रेंड ऑफ भाजपाच्या अदानी समूहाच्या न्यूज चॅनेलची आहे. NDTV मराठीचे मालक व संपादक दोघेही काँग्रेसी नाहीत!

जर मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे सिलेंडरची उपलब्धता आहे. तर भाजपच्या फ्रेंडचे न्यूज चॅनेल अफवा का पसरवत आहे? महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्या चित्रा वाघ, भाजपाचे सोशल मेडीयातील कार्यकर्ते व समर्थक यापैकी कोणी अफवा पसरवणाऱ्या या चॅनेलवर कारवाई करणार का?

'काहींना काही वेळ फसवता येते. काहींना सर्व वेळ फसवता येते. पण सर्वांना सर्व वेळ फसवता येत नाही.' याचा विसर पडलेले केंद्र व राज्य सरकार जनतेशी खोटं बोलून काय साध्य करत आहे?

बुधवार पर्यंत मुंबईतील ७५ टक्के हाॅटेल बंद होणार. म्हणून भाजपाच्या फ्रेंडचे न्यूज चॅनेल खरी बातमी देत आहे की खोटी? नेमकं कोणता काँग्रेसी अफवा पसरवतोय? जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांचे आवाहन जनता का ऐकत नाही? सोशल मेडीया सरकारच्या विरोधात का चालला आहे? मुख्यमंत्री खुलासा करतील काय? 

सगळे ट्रोल्स सुट्टीवर गेले काय?
close