ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी भाषेचे आद्य कवी, लेखक, साहित्यिक 'विष्णू वामन शिरवाडकर' उर्फ ' कुसुमाग्रज ' यांचा जन्मदिन महाराष्ट्र भर 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कविता, कथांचे वाचन आणि गायनांमधून कुसुमाग्रजांची ओळख करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ यांनी भूषवले. त्याचबरोबर मंचावर पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाटील, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात उपस्थित होते.
'मराठी भाषा गौरव दिना' निमित्त कु.खुशी धनावडे, अनुसया गलधर, पायल राठोड, धनश्री शिंदे, श्रावणी जाधव, पलक मुजावर, शिवानी जाधव, स्वरा केदारी, दिव्या चव्हाण, स्वरुपा हरपुडे, आर्या आहेर आणि साक्षीका खरात यांनी विविध कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ यांनी विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी विद्यार्थ्यांना पिपिटी द्वारे मराठी भाषेचे महत्व आणि 'कोश ' विषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. शिक्षक मनोगता मध्ये श्री.वैभव सूर्यवंशी यांनी कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या साहित्याविषयी आणि मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री योगेश कोठावदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढूमणे, प्रास्ताविक श्री.संजय पालवे तर आभार श्रीमती सुनीता इथापे यांनी मानले. प्रशालेचे तंत्रशिक्षक श्री.वैभव काब्दे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी श्री.मोहनराव ढाणे, श्री.विठ्ठल खेडकर, श्री.मुकुंद शिंदे, श्री.रवींद्र माळी उपस्थित होते. कार्यक्रमाची तयारी श्री.मयूर पवार यांनी केली.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नियामक मंडळ अध्यक्षा डॉ मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर श्री.अनिल खामकर आणि ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

