shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इराण युद्ध :- पर्शियन फासात अमेरिका, इस्रायल आणि अरबस्तान!(ICRR Shia Sunni Conflict)ज्येष्ठ पत्रकार विनय जोशी यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

व्हेनेझुएलाच्या निकोलाय मादुरो या अध्यक्षाला अमेरिकन सैन्याने काही तासात उचलून आणल्यानंतर ट्रम्पची नजर इराणी शिया राजवटीकडे वळली. मोसाद आणि अमेरिकेच्या योजनेनुसार इराण इराकच्या सीमावर्ती भागात असलेल्या शिया राजवटीचे कट्टर विरोधक असलेल्या कुर्दांना मोठी रसद पुरवून अख्ख्या इराणमध्ये जाळपोळ, दंगेधोपे करवले गेले. या इराणी लोकांचा नैसर्गिक उठाव आहे आणि त्यांच्या मदतीला जगातील लोकशाही देशांनी जाणं आपलं कर्तव्य आहे अशी घोषणा अमेरिकेने केली. इराणी राजवटीने इंटरनेट, मोबाईल संपर्क यंत्रणा बंद केल्यानंतर हिंसाचाराच्या घटनांचे व्हिडिओ जगाला दाखविण्यासाठी एलन मस्कच्या स्टारलिंक सेटेलाईट इंटरनेटची डिव्हाइसेस इराणमधील हिंसाचाऱ्यांना पुरवली गेली. 

पण त्यापैकी बलुचिस्तान मधून तिकडे पाठवलेली ३५,००० डिव्हाईस इराणी राजवटीने पकडली. शिवाय चिनी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यंत्रणांनी सक्रिय स्टारलिंक डिव्हाईस जप्त केल्याने दंगेखोरांचा जगाशी संपर्क तुटला आणि मग इराणी सैन्याने सरसकट सगळे दंगेखोर पकडून फासावर चढविण्याचा सपाटा लावला. इराणी शिया इस्लामी राजवट उखडून टाकण्याची पहिली योजना इथे गुंडाळावी लागली!

इराणी अण्वस्त्रे आणि मिसाईल प्रोग्राम संपवण्याची खेळी!

अंतर्गत बंड राजवट हटवायला उपयोगी पडेना म्हणून मग अमेरिकेने इराणवर दबाव टाकत इराणी अण्वस्त्र आणि मिसाईल प्रोग्राम बंद करण्याच्या चर्चेत ओढलं. याचा गाभा होता इराणकडे असलेलं सुमारे ५.२५ किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेच्या हातात सोपवणे आणि इराणी मिसाईल नष्ट करणे. इराणने चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात समृद्ध युरेनियम पैकी अर्धा साठा तिसऱ्या देशाकडे म्हणजे चीन किंवा रशियाकडे देण्याची तयारी दाखवली होती अशा बातम्या होत्या पण मिसाईल प्रोग्राम बंद करण्याच्या अमेरिकन मागणीला इराणी सरकारने केराची टोपली दाखवली. 

पण एकंदर नेतान्याहू आणि ट्रम्प यांनी युद्धाचा निश्चय केल्याने त्यांना या चर्चेशी काहीही देणंघेणं नव्हतं आणि अचानक २८ फेब्रुवारीला इस्रायली सैन्याने इराणवर हल्ले सुरू केले. त्याला समर्थन म्हणून अमेरिकेने सुद्धा हल्ले सुरू केले.

नेतान्याहू आणि ट्रम्पची प्राथमिकता...

गाझा युद्धापासुन अंतर्गत राजकारणात नेतान्याहू अडचणीत आहेत आणि एपस्टन फाईल्स मध्ये ट्रम्पने १२, १३ वर्षाच्या कोवळ्या मुलींवर बलात्कार केल्याचे व्हिडिओ आणि अन्य पुरावे असल्याने अमेरिकेत त्याच्याविरोधात मोठा असंतोष आहे. याला अन्यत्र वळविण्यासाठी या दोन नेत्यांनी हे युद्ध जगावर लादलं असा आरोप होतो आहे. 

त्यामुळे कोणतीही मोठी पूर्वतयारी न करता अती आत्मविश्वासाच्या बळावर या दोन नेत्यांनी अख्ख्या अरब जगताला आणि त्यांच्या दोस्त राष्ट्रांना या युद्धात लोटलं आहे. या युद्धाच्या पहिल्या तीन दिवसातच जो प्रकार समोर येत आहे त्यामुळे आगामी काळाच्या रक्तरंजित भविष्याची आपल्याला खात्री पटू लागली आहे.

मोसादच्या यशाच्या सुरस कथा...

युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणी धार्मिक नेता खामेनी यांच्या सोबत बैठकीला बसलेले सर्व इराणी सैन्य अधिकारी आणि राजकीय नेते इस्रायली हल्ल्यात मारले गेले, त्यांना एकत्र येऊ देण्यासाठी मोसादने अमुक तंत्र वापरलं, तमुक ज्युइश महिला शिया मुस्लिम धर्मात धर्मांतरित होऊन इराणी राजवटीच्या आरपार प्रवेश मिळवून मोसादला माहिती पुरवता होती, इराणी डॉक्टर, डेंटिस्ट मोसादला इराणी सैन्य नेतृत्वाची बित्तंबातमी देत होते वगैरे सुरस कथांचा सध्या महापुर आलेला आहे. पण हे सगळे केविलवाणे प्रकार आहेत.

मागच्या वर्षीच्या १२ दिवसांच्या युद्धात इराणी मिसाईल उत्पादन व्यवस्थेचा कणा आम्ही मोडला आहे आणि आता आम्ही हल्ला केल्यास इराण ७२ तासात शरण येईल या कल्पनेने इस्रायल, अमेरिका या युद्धात उतरलेली आहे. प्रत्यक्षात काय झालं आपण बघत आहोत!

७ ऑक्टोबरचे हम्मासाचे हल्ले असोत किंवा सध्याच्या युद्धात इराणी मिसाईल उत्पादन आणि विकेंद्रित सैन्य तुकड्यांची संचालन पद्धती असो, इराणी मिसाईलनी अरब देशात माजवलेला हाहाकार मोसाद आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या नजरेतून सुटला आहे यात कोणताही वाद नाही.

इराण युद्धाची सद्यस्थिती...

इराण युद्ध सुरू करताना अमेरिका, इस्रायल यांची नीती होती "रिजिम डीकॅपीटेटिंग स्ट्राईक्स" म्हणजे राजवटीचं नेतृत्व अचूक हल्ले करून संपवून टाकायचं, प्रमुख राजकीय नेते, सैन्य अधिकारी मारून टाकायचे आणि सेना आणि सैन्य नेतृत्वादरम्यानचा संपर्क संपवून सैन्याला आपली बाजू बदलायला आणि राजवटीच्या विरोधात बंड करायला भाग पाडायचं.

पण या उद्दिष्टात इस्रायल, अमेरिका सपशेल विफल झाले आहेत. हे अपयश लपविण्यासाठी पहिल्याच दिवशी ५० इराणी सैन्य अधिकारी एकाच ठिकाणी मारले गेल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या. समजा ते खरंच मारले गेले असतील तर गेले ७२ तास अरब देशात ते थेट सायप्रस पर्यंत हजारो मिसाईल आणि ड्रोन कुणाच्या आदेशावरून डागली जात आहेत हा प्रश्न अनुत्तरित राहतो!

पहिल्या तीन दिवसात इराणने बारा देशातील २७ अमेरिकन, नाटो सैन्य तळांवर मिसाईल हल्ले करून ते जाळले आहेत, इस्रायली एयर डिफेन्स यंत्रणांवर अभूतपूर्व दबाव आहे, इस्त्रायलची सर्व प्रमुख शहरे इराणी मिसाईलच्या माऱ्यात आली आहेत. बहारीन मधील अमेरिकन ५ वे आरमार असलेला तळ अक्षरशः बेचिराख झाला आहे. अरब आर्थिक साम्राज्याचं प्रतीक असलेला बुर्ज खलिफा, पाम जुमैराह, रियाध, दुबई, दोहा, कुवैत येथील मोठी नामांकित हॉटेल्स इराणी हल्ल्यात सापडली आहेत. सायप्रस मधील ब्रिटिश एअर बेसवरील हल्ल्यानंतर तो बेस रिकामा करण्यात आला आहे.

बहरीनला सौदी अरेबिया सोबत जोडणारा किंग फहद पूल काल रात्री इराणने मिसाईल डागून निकामी केल्याची बातमी आहे.

अमेरिकन, इस्रायली युद्ध उद्दिष्टे!

१) इराणी राजवट उलथवून नवी गुलाम राजवट स्थापित करणे हा मूळ अमेरिकन उद्देश आहे पण त्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे सध्या अमेरिका आणि इस्राएल इराणी मिसाईल उत्पादन आणि प्रक्षेपण ठिकाणांवर हल्ले करून ती नष्ट करण्याचा उद्देश बाळगून आहेत. अमेरिका मुख्यतः पॅट्रीयट आणि थाड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम वापरते आणि इस्राएल आयर्न डोम सिस्टम वापरते. एका इराणी मिसाईलची किंमती जास्तीत जास्त २० हजार डॉलर असते आणि एका एअर डिफेन्स मिसाईलची किंमत ४० लाख डॉलर असते.त्यामुळे अमेरिकन उद्दिष्ट ही मिसाईल उडण्याच्या आधी त्यांच्या साठ्यांवर हल्ले करून रोखणं हा आहे.

२) सतत हल्ले करत इराणी राजवटीला चीनसोबत असलेले व्यापारी संबंध आणि डॉलरला बाजूला सारून चिनी युआन चलनात होणारा इराणी व्यापार परत डॉलरमध्ये आणायला भाग पाडणं.

३) मध्य आशिया, पश्चिम आशिया, आखाती देशात एकूण शिया लोकसंख्या सुमारे ४०% आहे. यापैकी इराण, बहरीन, इराक, अझरबैजान मध्ये शिया बहुसंख्य आहेत आणि सिरिया, लेबनॉन, कुवैत, येमेन मध्ये ४०% च्या आसपास आहेत. सौदीच्या तेल उत्पादन पट्ट्यात शिया बाहुल्य आहे. इराणची महत्त्वाकांक्षा सर्व शिया बहुल भागावर आपला एकछत्री अंमल निर्माण करून इस्रायल आणि बाकी तेल समृद्ध सुन्नी राजवटींना आपल्या दबावात ठेवणं हा आहे. यामुळे हा अंमल कमी करणे ही इस्रायल, अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांची राजकीय प्राथमिकता आहे.

४) स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मध्ये स्वतः इराण आणि सुवेझ कालव्यातून बाहेर येणाऱ्या रेड सी शिपिंग लेन्स अरबी समुद्राला मिळतात तिथे इराण समर्थित शिया हौती बंडखोरांनी आपला मोठा प्रभाव निर्माण केल्याने बाब अल मांदेब मधून अरबी समुद्रात येणारी व्यापारी जहाजे इराण आपल्या इच्छेने केव्हाही बंद करते. यामुळे इराणवर सैनिकी वर्चस्व मिळवून हा प्रभाव मोडून काढण्यासाठी इस्रायल, अमेरिका प्रयत्न करत आहे. याचा एक भाग म्हणून बाब अल मांदेबच्या दुसऱ्या बाजूला इस्रायलने सोमालियापासून मुक्त झालेल्या सोमालीलँड देशाला राजनैतिक मान्यता दिली आहे. जागतिक तेल व्यापाराचा ३७% कारभार या भागातून होतो त्यामुळे इराणचा बीमोड केल्यास हा व्यापार सहजपणे आपल्या नियंत्रणात येईल अशी अमेरिका इस्त्रायलची भूमिका आहे.

५) इराणमध्ये गुलाम राजवट आणून तिथल्या तेल आणि गॅस साठ्यांवर अमेरिकन कंपन्यांची मालकी प्रस्थापित करणे.

इराणची उद्दिष्टे!
१) अमेरिका आणि यहुदी इस्रायल समोर न झुकणारा एकमेव इस्लामी देश इराण आहे हे जगातील सर्व शिया, सुन्नी मुस्लिमांच्या मनावर ठरवणे.
२) शिया क्रेसेंट अमलात आणणे अर्थात मध्य पूर्वेतील ४०% शियांना जोडणारा ओमान ते सिरिया, लेबनॉन या ११ देशांमधील सर्व शियांना इराण हेच सैनिकी नेतृत्व आहे हे लोकांच्या मनावर बिंबवणे.
३) अरब आर्थिक साम्राज्याचा आत्मा असलेल्या दुबई, अबू धाबी, रियाध, दोहा या शहरांची इराणी हल्ल्यात नासधूस करून सुन्नी अरब राजवटींना आणि जनतेला "अमेरिका तुमची सुरक्षा करू शकत नाही" हे सिद्ध करून दाखवणे.
४) अमेरिकन आणि इस्रायली एयर डिफेन्स मिसाईल सिस्टिमची शक्ती संपवून इस्रायली हवाई सुरक्षा यंत्रणा उघडी पाडणे आणि अरब आर्थिक केंद्रे जाळून अरब देशांना अमेरिकेवर इराणविरोधी सैन्य कारवाई थांबविण्यासाठी दबाव आणणे.
५) स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आणि बाब अल मांदेबच्या तेल, गॅस शिपिंग लेन्स वर बंदी आणून जगातील तेल, गॅस बाजारात अभूतपूर्व खळबळ माजवून त्याचे दर वाढवणे आणि रशियन तेलातील निर्बंध ढिले पाडायला मदत करणे.
६) या युद्धात सुन्नी अरब राजवटींना बळजबरीने ओढून अख्ख्या जगात शिया विरुद्ध सुन्नी आग लावून देणे, बहरीन सारख्या देशात जिथे अल्पसंख्य सुन्नी राजेशाही बहुसंख्य शियांवर राज्य करत आहे तिथे शिया राजवट सत्तेत आणणे.
७) अरब देशातील सर्व अमेरिकन सैन्य तळ बाहेर हाकलून चीनसाठी रस्ता मोकळा करणे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणी हल्ल्यांनी अरब देशातील सर्व अमेरिकन तळ जाळल्याने याचा पहिला टप्पा पार झाला असं आपण समजू शकतो.
९) गेली कित्येक वर्षे इराणी तेलावर अमेरिकेने निर्यात प्रतिबंध लादले आहेत, या युद्धानंतर आपली सैनिकी ताकद सिद्ध करून ते निर्बंध झुगारून लावणे आणि आपली आर्थिक बाजू मजबूत करणे.
१०) जागतिक गुंतवणुकीची सुरक्षित, खात्रीची केंद्रे म्हणून निर्माण झालेली अरब देशांची ओळख पुसून टाकणे जेणेकरून अरबस्तानात कोणतीही गुंतवणूक करायची असल्यास इराणला विश्वासात घेऊनच करावी लागेल हा संदेश जागतिक गुंतवणूकदारांपर्यंत पोचेल.
close