गटनेते अशोक वाघ यांच्या उपस्थितीत एक तास मेडिटेशन; मंगल मैत्री सदनमधील कार्यक्रमास साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर प्रतिनिधी:
निहाळोद येथील मंगल मैत्री सदनमध्ये नुकताच सामूहिक साधना आणि बुद्ध वंदना कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित केलेल्या एक तासाच्या मेडिटेशन (ध्यानसाधना) सत्रामुळे उपस्थित साधकांना मनःशांती आणि आत्मिक समाधानाचा अनुभव घेता आला.
या आध्यात्मिक कार्यक्रमात ध्यानसाधना आणि बुद्ध वंदना झाल्यानंतर सर्व उपस्थित साधकांना अल्पोपहार देण्यात आला. परिसरातील अनेक साधकांनी या उपक्रमात एकत्र येत सामूहिक साधनेचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास गटनेते अशोक वाघ यांच्यासह मा. संतोष काढरे सर, युवराज पाटील, राकेश रायते, परमेश्वर कोळी, हिम्मत बोरसे, श्रीमती अन्नपूर्णा बाई, सौ. सीमा काढरे आणि सौ. प्रीती काढरे आदी मान्यवर व साधक उपस्थित होते. सर्वांच्या सहभागाने हा कार्यक्रम अत्यंत चैतन्यमय वातावरणात पार पडला.

