shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीची हीबा पल्लीपरमबील उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेत इंदापूर तालुक्यात प्रथम**जय भवानीगड विकास प्रतिष्ठानने जपली उज्वल यशाची परंपरा कायम**सलग सात वर्षे 100% निकाल*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीची हीबा पल्लीपरमबील उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेत इंदापूर तालुक्यात प्रथम*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठानने जपली उज्वल यशाची परंपरा कायम*
*सलग सात वर्षे 100% निकाल*
इंदापूर:जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित,
 विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा 2026 च्या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 327 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 327 विद्यार्थी पात्र झाले आहेत म्हणजेच विद्यालयाचा 100 % निकाल लागला आहे.
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये विज्ञान व कॉमर्स अशा दोन शाखा असून दोन्ही शाखेतील उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
327 विद्यार्थ्यांपैकी 318 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले आहेत. 09 विद्यार्थी द्वितीय श्रेणीने पास झाले आहेत. 

विज्ञान विभागातील एकूण 283 विद्यार्थी पात्र ठरले आहेत, पीकविज्ञान या विषयात 10 विद्यार्थ्यांनी 200 पैकी 200 गुण मिळवून राज्यात प्रथम  येण्याचा बहुमान पटकावला आहे.  

*गुनानुक्रमे निकाल खालील प्रमाणे* 

1) पल्लीपरमबील हीबा अब्दुल हमीद 
  539/600      89.83%

2) यादव प्राची राहुल 
522/600      87.00%

3) यादव प्रिया राहुल 
510/600         85.00%

वाणिज्य विभाग 

1) कवडे अनुष्का सोमनाथ 
535/600     89.17%

2) कवडे वैष्णवी विठ्ठल 
534/600     89.00%

3) राजमाने आकांक्षा बाळासाहेब 
499/600        83.17%


यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष तथा गटनेते, जिल्हा परिषद सदस्य.श्री.श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष तथा लाखेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.चित्रलेखा ढोले, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे सहसचिव सौ. पौर्णिमा पोर्णिमा खाडे,
 मुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव, विश्वस्त चि. पृथ्वीराज ढोले, 
चि. ऋषिकेश ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार,
प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य श्री. सम्राट खेडकर, मार्गदर्शक शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
close