shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उर्दु घर मुस्लिम अल्पसंख्यांक भवन मंजुर करण्यात यावे.इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेेशनचे पालकमंत्र्यांना निवेदन


नंदुरबार(प्रतिनिधी)-उर्दु घर मुस्लिम अल्पसंख्यांक भवन मंजुर करण्यात यावे, अशी मागणी इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेेशनचे संस्थापक राज्याध्यक्ष एजाज बागवान यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे. 

निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हयातील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचे लोक समूहाची प्रगती व उन्नतीसाठी जिल्हा स्तरावर सामाजिक न्याय भवन प्रमाणे उर्दू घर/मुस्लिम अल्पसंख्यांक भवन मंजूर करण्यात यावे व त्यात अत्याधुनिक सुसज्ज ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कॉन्फ्रेंस हॉल, संगणक कक्ष, मौलाना आजाद आर्थीक विकास महामंडळ कार्यालय, तसेच स्वयं रोजगार निर्माण करणे साठी स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस करीता क्लासरुम व अल्प संख्यांक समाजा संबंधीत विविध कार्यालय व योजनांचे माहिती केंद्र हया सर्व बाबी एकाच इमारतीत उपलब्ध होतील त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक व आर्थीक उन्नतीसाठी सोयीस्कर होईल.
सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार हे आता सध्या टोकरतलाव रस्त्यावर दोन वर्षापासून स्थलांतरीत झाले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आता सद्या खाली रिक्त पडलेले आहे. आणि जुने विशेष सार्वजनिक बांधकाम विभाग हे मुस्लिम बहुल अल्पसंख्यांकांचे परिसरात आहे. म्हणून या ठिकाणी उर्दू घर मुस्लिम अल्पसंख्यांक भवन निर्माण करावे असे आदरणीय वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री यांनी मा.जिल्हाधिकारी यांना आपल्या स्तरावरुन आदेशीत करावे. उर्दू घर मुस्लिम अल्पसंख्यांक भवनासाठी अल्पसंख्यांक मंत्री समवेत मंत्रालयात ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष एजाज बागवान तसेच पदाधिकार्‍यांसमवेत बैठक लावून शासनाकडून तरतूद करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतांना रियाज कुरेशी, नासीर मन्यार, जावेद अहमद, अमीन कुरेशी, शेख मुस्तफा, दानिश बागवान आदी उपस्थित होते.
close