मोर्शी- शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत घेण्यात आलेल्या ग्रीष्मकालीन क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉक्टर पोतदार यांनी मोर्शी शहरात रक्तदान चळवळ राबवून जवळपास 3000 बॉटल रक्त संकलित करण्याचा विक्रम मोडला डॉक्टर प्रमोद पोतदार यांचा मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख, उप मुख्याध्यापक मिलिंद ढाकुलकर यांनी स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. वैद्यकीय अधिकारी दिलीप टीगणे, संगीता जैन, विनय शेलुरे यांचेही स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर गजानन पाटील शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

