शौकतभाई शेख / श्रीरामपूर:
श्रीरामपूर येथील संगमनेर रोड स्थित रिमांड होम परिसरात भारतीय राज्यघटनेने शिल्पकार, विश्वरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नव स्वराज्य सेनेच्या वतीने एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रिमांड होम येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्या पुस्तकांचे वाटप तसेच भोजनदान करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. नव स्वराज्य सेनेचे अध्यक्ष विजयराव खाजेकर आणि रिमांड होमच्या अधीक्षक अक्षदा पाठक मॅडम यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर नवीनच अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या अक्षदा पाठक मॅडमचा याप्रसंगी सत्कारही करण्यात आला.
यावेळी रज्जाक शेख सर, कवी आनंदा साळवे, दशरथ भोंगळे सर,एन.व्ही. बढे सर,तसेच विजयराव खाजेकर यांची मार्गदर्शक भाषणे झाली.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. यानंतर विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले आणि नव स्वराज्य सेनेच्या वतीने भोजनदान करण्यात आले. कार्यक्रमास अधीक्षक अक्षदा पाठक मॅडम, राकेश कुलथे सर, बोर्डे मावशी, राजूभाई सय्यद, उत्तमराव हिवराळे, संजय वाहुळ, दत्तू शिरसाठ, डॉ. अशोक शेळके, हमीद चौधरी , इब्राहिमभाई शेख, कवी आनंदा साळवे, दादासाहेब खंडागळे, रमेश शेळके, प्रकाश साळवे, अशोक बावस्कर, सागर बागुल, आनंद साळुंखे, सागर ओहळ, हर्ष बावस्कर, किरणभाऊ कतारे, . रज्जाकभाई शेख सर , अंतोन भरपुरे आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम समाजात शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा ठरला.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

