अहिल्यानगर | प्रतिनिधी (दि. 30 एप्रिल 2026)
लेट लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची Indian Council of Medical Research (ICMR) येथे शैक्षणिक भेट मोठ्या उत्साहात पार पडली. या भेटीत एकूण 42 विद्यार्थी तसेच प्राध्यापक उल्का मोटे आणि सौरभ सांगळे यांनी सहभाग नोंदवला.
या औद्योगिक व शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी ICMR मधील विविध अत्याधुनिक विभागांना भेट देत आधुनिक संशोधन प्रक्रियेचा जवळून अभ्यास केला. विशेषतः Fluro Cytometer, Animal House, Genetic Research Center, Focal Microscope, HPLC, PCR, Peptide यांसारख्या प्रगत उपकरणे व तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
तज्ज्ञांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर पडली असून, त्यांच्या संशोधनाभिमुख विचारसरणीला चालना मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले. अशा प्रकारच्या शैक्षणिक भेटींमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच व्यावहारिक अनुभव मिळतो आणि संशोधन क्षेत्राकडे त्यांचा कल वाढतो, असेही त्यांनी नमूद केले.
या यशस्वी भेटीचे आयोजन आणि सहकार्याबद्दल ICMR च्या डॉ. प्रभजित कौर तसेच संचालक डॉ. गीतांजली सचदेवा यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे ही भेट अत्यंत उपयुक्त आणि संस्मरणीय ठरली.
या शैक्षणिक भेटीचे नियोजन प्रा. उल्का मोटे यांनी केले होते. तसेच या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण उत्तेकर आणि सचिव उत्तमदादा फडतरे यांनी परवानगी व प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

