शिर्डी प्रतिनिधी: (तुषार महाजन)
शिर्डी येथील परिचित सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकताच त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुढील वाटचालीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार समारंभासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. नानासाहेब शिंदे यांचा सत्कार करताना प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक हिम्मतराव होळकर, प्रतिष्ठानचे सल्लागार आसाराम वारे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्वच मान्यवरांनी नानासाहेब शिंदे यांनी शहरात केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

