शिर्डी ग्रामस्थांच्या बैठकीत संजय शिंदे रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री साईबाबा संस्थान शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणाऱ्या श्री रामनवमी उत्सव २०२६ च्या नियोजनासाठी नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी संजय भागवतराव शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले की, साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा रामनवमी उत्सव सर्वांना बरोबर घेऊन आणि एकविचाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून यशस्वी केला जाईल.
याप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्यासह ग्रामस्थ, नगरसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नितीन शेळके, सचिन कोते, निलेश कोते, रमेश गोंदकर, नितीन उत्तम कोते, पप्पू शेजवळ, ताराचंद कोते, अशोक पवार, सचिन शिंदे, मधुकर कोते, बाळासाहेब गोंदकर, नंदू गोंदकर, बापू ठाकरे, राजेंद्र कोते, उत्तम कोते, बाळासाहेब कोते, शिवाजी गोंदकर, सचिन शिंदे, ज्ञानदेव गोंदकर, नितीन कोते, नानासाहेब शिंदे, नानासाहेब काटकर, दीपक शिंदे, गणेश कोते, अरविंद कोते, अमृत गायके, किरण कोते, सचिन शेजवळ, नितीन शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

