shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अकोलेत विधी व सेवा महाशिबीर व महामेळावा



सरकारी काम आणि सहा महिने थांब असा अनुभव सामान्य  जनतेला आला नाही पाहिजे - न्यायमूर्ती विभा कंकणवाडी

नगर प्रतिनिधी:
 सरकारी काम आणी सहा महिने थांब असा अनुभव आला नाही पाहिजे यासाठी शासनाचे योजना सर्वसामान्या पर्यंत पोहचवण्यासाठी असे कार्यक्रम महत्वाचे असतात.जिथे लोकांना लाभ देता येते व कर्तव्य ही सांगता येते असा हा महामेळावा आहे.ज्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला त्यांनी स्वतःची आर्थिक,समाजिक प्रगतीकडे एक पाऊल टाकले आहे.अकोले कराचा या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला आसुन प्रत्येकाने उन्नत भारताचे,प्रगतशिल राष्ट्राचे ,सुसंपन्न राज्याचे स्वप्न पाहावे असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी यांनी केले .
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या विशेष निर्देशान्वये अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अकोले तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्हा व तालुका प्रशासनासह शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने आणि अकोले व राजूर तालुका वकील संघाच्या सहकार्याने आज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अकोलेच्या मैदानावर विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा व लाभ वितरण कार्यक्रम संपन्न झाला आहे.यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती श्री. रोहित जोशी,अहमदनगर जिल्हा पालक न्यायमूर्ती श्री मेहरोज पठाण,अहमदनगर प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आशिष पाटील,अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री बाळासाहेब कोळेकर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (भा.पो.से.), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव योगेश पैठणकर, अकोले न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) धिरज हिंग्लजकर, तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड वसंतराव मनकर व्यासपीठावर उपस्थित होते
     यावेळी बोलताना औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी म्हणाल्या की न्यायालयीन विभागा अंतर्गत अनेकदा चर्चासत्र ,कार्यशाळा होते मात्र तेथे लोकांची उपस्थिती नसते कारण तिथे आम्ही आश्वासन देत नाही.त्यासाठी वेगळे व्यासपीठ हवे असते जिथे लोकांना लाभ देता येते व कर्तव्य सांगता येते असे व्यासपीठ आजचा महामेळवा आहे.शासन अनेक योजना सुरु करते मात्र सर्व योजनाची माहिती सर्व लोकाना ,शेवटच्या घाटकांना होत नाही .शासनाच्या सर्व योजना प्रत्येक लाभार्थी पर्यंत पोहचली जावी व त्याचा लाभ सर्वांना घेता यावा.तसेंच आदिवासी,दुर्बल,घटक यांना मुख्य प्रवाहात आणता यावे यासाठी हा महामेळवा आहे.याठिकाणी शासनाच्या सर्व विभागाचे स्टॉल लावलेले आहेत यातून सर्वांना माहिती मिळेल यात विनाकारण कुणाची अडचण होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अश्या सूचनाही न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी यांनी केल्या .
  यावेळी न्यायमूर्ती श्री. रोहित जोशी म्हणाले की न्याय म्हणजे केवळ न्यायालयात दिला जाणारा न्याय नाही.संविधानाचे उदिष्टात म्हटले आहे जस्टीज फॉर ऑल अर्थात न्याय सर्वासाठी आहे त्यामुळं आजचा महामेळावा म्हणजे न्याय दानाचेच एक रूपाने कार्य आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी याची संकल्पना होती देशाचे प्रत्येक गाव आत्मनिर्भर तसेच् पूर्णत्वास येणारे अर्थीक घटक असणारे गाव असावे .प्रत्येक माणसाला त्याचे हक्क त्याचे दारी,घरी मिळावा म्हणून आजचा कार्यक्रम आहे.ज्ञान म्हणजे पावर आहे मात्र आजच्या काळात माहिती तंत्रज्ञान हे ही एक पावर (ताकद )आहे.प्रत्येकाने आपले कर्तव्य पालन केले नाही तर कुठेतरी कोणी बाधित होतो .प्रशासनाने ही पुढे असे काम करावे की भविष्यात असे मेळावे घेण्याची गरज पडू नये असे आवाहन केले.
     यावेळी अकोले तालुक्यातील अकराशे पेक्षा जास्त नागरिकां ना लाभ देण्यात आला. सर्व स्टॉल वरती न्यायमूर्तींनी भेट देऊन शासकीय योजनाची माहिती घेतली. बचत गटाच्या वस्तूंची खरेदी सुद्धा केली.
   अकोले न्यायालयाचे न्यायाधीश राधाकिशन टेमसे, राजूर चे न्यायाधीश सचिन नेहरकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने, पोलीस निरीक्षक बोरसे, निवासी नायब तहसीलदार किसन लोहरे, महसूल नायब तहसीलदार प्रमोद सावंत, वीज वितरण उप अभियंता नामदेव शेळके, विठ्ठल सोनवणे, गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत, महिला बालकल्याण अर्चना एखंडे, कृषीअधिकारी रत्नप्रभा शिंदे, पशुधन अधिकारी डॉ. अशोक धिंदळें,  पुरवठा अधिकारी संदीप निळे, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार सचिन बांबळे,सेतू प्रतिनिधी सुशांत वाकचौरे, रोटरी क्लब चे विद्याचंद्र सातपुते, आदींनी जनतेच्या प्रश्नाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोले तालुका विधी सेवा समितीचे सदस्य मच्छिंद्र मंडलिक, राम रुद्रे, सुमिरण मालुंजकर, दत्ता शेणकर, दत्तात्रय मुठे, रामदास पवार, विजया पाडेकर, सुमन जाधव, मंगल मालुंजकर, मीना म्हसे, अशोक उघडे, श्याम खलाने,  आदींनी मदत केली.
close