shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपुरात डेंग्यू-मलेरिया मुक्तीसाठी जनजागृती; संत ज्ञानेश्वर बी.एड. महाविद्यालयातर्फे आरोग्य व्याख्यान व रॅली


वडाळा महादेव  ( प्रतिनिधी )
वाढत्या पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर, श्रीरामपूर येथील प्रेमसी रतनसी पटेल हायस्कूल मध्ये डेंग्यू आणि मलेरिया प्रतिबंधात्मक जनजागृतीसाठी आरोग्य व्याख्यान व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, संत ज्ञानेश्वर शिक्षण शास्त्र (बी.एड.) महाविद्यालयाच्या छात्र-अध्यापकांनी या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. तज्ज्ञांचे मार्गदर्शन: "प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय"


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. श्रीरामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. नागरगोजे सर यांनी मुख्य वक्ता म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. डेंग्यू आणि मलेरिया हे दोन्ही आजार डासांमुळे पसरत असल्याने, साचलेले पाणी उपसणे, स्वच्छता राखणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. जनजागृती रॅलीला मोठा प्रतिसाद
व्याख्यानानंतर महाविद्यालयाच्या छात्र-अध्यापकांनी हातात आकर्षक पोस्टर्स आणि घोषवाक्ये घेऊन परिसरात रॅली काढली. घोषणांच्या माध्यमातून डेंग्यू-मलेरियापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीला स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. अशा जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे समाजात आरोग्याप्रती सजकता निर्माण होते आणि एक सकारात्मक संदेश जातो."डॉ. सुरेश पाटील बेल्हेकर (अध्यक्ष, सुलोचना बेल्हेकर संस्था)
मान्यवरांची उपस्थिती व सहकार्य
या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या  स्वाती गव्हाणे प्रा मनिषा भोईटे व प्रा. शेखर जाधव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रेमसी रतनसी पटेल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे सर व उपमुख्याध्यापक श्री. मेहेत्रे सर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कौतुक व आभार
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील बेल्हेकर व डॉ. रंजनाताई बेल्हेकर यांनी सर्व छात्र-अध्यापकांच्या कष्टाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन मोनी वायकर यांनी केले, तर रोहिणी संगपाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
close