shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी एकनाथ षष्ठी उत्साहात साजरी.

वडापुरी एकनाथ षष्ठी उत्साहात साजरी.
इंदापूर: श्री मच्छिंद्रनाथ व श्री गोरक्षनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडापुरी नगरीत  श्रीनाथ मंदिर येथे श्री संत एकनाथ महाराज नाथ षष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. 
दिनांक 9 मार्च रोजी सकाळी दहा ते बारा यावेळी हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज बोधले यांचे नाथ षष्ठी निमित्त हरिकीर्तन संपन्न झाले यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला सदर महाप्रसाद वकील वस्तीचे दानशूर नेतृत्व ज्ञानेश्वर साहेबराव घोगरे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी वडापुरी गाव व पंचक्रोशीतील भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
close