शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह:-
शिर्डी:- संपूर्ण राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडवून देणारे व अंध महिला भक्त जनतेला हादरून सोडणारे नाशिकच्या लिंगपिसाट कॅप्टन अशोक खरातचे 'बिंग' अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलानेच फोडले हे त्रिवार सत्य आता लपून राहिले नाही.
कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे या दोन 'सोमनाथांनी' शिर्डीतील दाखल गुन्ह्यावरून ही समाजाला हादरून सोडणारे भोंदू कॅप्टन अशोक खरातचे लिंगपिसाट रूप समोर आणले त्यांना डीवायएसपी अमोल भारती, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे या शिर्डीतील पोलीसांची तत्परता कामी आली. थोडक्यात असे की, १८ फेब्रुवारीला शिर्डी परिसरातील एक सधन घरच्या २४ वर्ष तरुणीने नाशिकच्या जाधव नावाच्या तरुणाविरुद्ध अश्लील फोटो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा एसपी.सोमनाथ घार्गे व सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी भारती व पोनि.गलांडे यांनी तपास केला असता आरोपी नाशिकचा बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कार्यालयात कामाला असल्याचे समजले पोलीसांनी कोणताही वेळ न घालवता थेट आरोपी जाधव या तरुणाला पकडले. त्याला विश्वासात घेतले असता त्याच्या जवळून पेनड्राईव्ह मिळाला तो तांत्रिक दृष्टया तपासला असाता पोलीसांना लिंगपिसाट कॅप्टन अशोक खरात याचे खरे रूप समोर आले. मग काय ह्या कॅप्टन खरातच्या अश्लील व्हीडीओने अनेक वेगवेगळ्या महिला, आजी-माजी मंत्री, महिला आयोगाच्या रुपाली या सर्वाचेच फोटो चर्चेत आले आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात व अंध महिला भक्तांमध्ये खळबळ उडाली.
ऐवढ्या मोठ्या 'सेक्स बॉम्ब' ला उघड करणाऱ्या अहिल्यानगर पोलीसांची राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हयाचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठ थोपटली असणारच. कारण धार्मिक व जोतिष चेहऱ्याच्या आडून भोंदू लिंगपिसाट कॅप्टन अशोक खरातचे बिंग फुटले.
००००

