जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
रुपाली चाकणकर राजीनामा विषयात भाजप पदाधिकारी सोशल मीडियावर बोंब मारत आहेत पण इथे बोंब मारण्यापेक्षा यांनी पक्षाच्या बैठकीत किंवा त्यांचा जो कुणी नेता असेल तिथं शब्द टाकायला हवा ना? की पक्षात यांना काडीची किंमत नाही?
चित्रा वाघ ज्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी गृहविभागाने अशोक खरातवर काय कारवाई केली यावर आपल्याच सरकारची पाठ थोपटत आहेत पण या बाईंनीही महिला आयोगाने या भोंदूला वाचवण्यासाठी महिला आयोगाने पत्रकारावरच गुन्हा दाखल करावा असे अधिकृत पत्र पोलिसांना लिहिलेले आहे त्याबद्दल चकार शब्द काढला नाही.
मुळातच अशोक खरातचे व्हिडिओ त्याचाच ऑफिस बॉय नीरज जाधवने बाहेर काढले नसते तर त्याच्याविरोधात कुठलीही महिला समोर येऊन तक्रारच देऊ शकली नसती कारण तिचं तोंड महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरने बंद केले असते. अशा गोष्टी घडल्याही असतील पण त्या समोरही आल्या नसतील.
अशोक खरातचे व्हिडिओज बाहेर आल्याने सरकारला कारवाई करावी लागली. नाहीतर जेव्हा त्याचा ऑफिस बॉय याच्या काळया कृत्यावरून याला ५ कोटींसाठी ब्लॅकमेल करत होता तेव्हाच पोलिसांनी या प्रकरणाच्या मूळाशी जायला हवे होते पण पोलिसांनी तपासाचा आवाका ब्लॅकमेलिंग केसपर्यंतच ठेवला. आता हे मुद्दाम केलं की यातही महिला आयोग थोरातच्या बाजूने होता हे माहिती नाही.
राज्याचा महिला आयोग हा संविधानिक आयोग नसून तो वैधानिक आयोग आहे जो कायद्याने बनवलेला आहे. असे संविधानिक किंवा वैधानिक दोन्ही आयोग हे त्या त्या संबंधित मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असतात.यांचा स्टाफ, यांचा पगार आणि यांचे भत्ते तसेच अहवाल हे सगळं संबंधित मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.त्यामुळे महिला व बालविकास मंत्रालयही यात हस्तक्षेप करू शकते. परंतू रुपाली चाकणकर यांचे सत्तेतील नेत्यांशी असलेले संबंध बघता अशी हिंमत मंत्र्यांनी केली नसावी.
राज्यातील महिलांमध्ये महिला आयोगाची प्रतीमा इतकी खराब झालेली असतानाही आणि महिला आयोगाने महिलांच्याच हितास टाच लावल्याचे पुरावे असूनही रुपाली चाकणकरचा राजीनामा होत नाहीये आणि जर रुपाली चाकणकर पदावर राहिल्या तर अशोक खरात सहीसलामत सुटेल याचीच शक्यता जास्त आहे.
एखाद्या राज्याची महिला आयोग अध्यक्ष इतकी पॉवरफूल असेल हे पहिल्यांदा अनुभवतोय. चाकणकरने आपल्या प्रभावाचा वापर करून महिला आयोगाच्या माध्यमातून आपले वर्चस्व वाढवले यात दुमत नाही.पण हे करताना राज्यातल्या महिलांच्या विरोधातच आयोगाने काम केले आहे हे उघड आहे.
या प्रकरणात चाकणकर वाचल्या तर समजून जा की कुठल्यातरी प्रबळ नेत्याचा पाठींबा चाकणकरच्या मागे आहे त्यामुळेच भाजप पदाधिकारी काय किंवा अख्खा महाराष्ट्र दिवसरात्र बोंबलला तरी चाकणकर पदावरच कायम असतील.
टिप: सदरील फोटोत रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या म्हणण्यानुसार आपले बोट कापून घेतले होते असा दावा एका पीडित महिलेने केला आहे अन् असे अनेक फोटो सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये टाकले आहेत त्यातलाच एक फोटो इथे जोडला आहे.
000

