राज्यात वडापुरीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी झळकले.
इंदापूर :1 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या राज्यस्तरीय मंथन सामान्यज्ञान परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा वडापुरी चे तीन विध्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. इयत्ता दुसरीतील विध्यार्थीनी आरोही विठ्ठल कदम हिचा इंदापूर तालुक्यात प्रथम क्रमांक, पुणे जिल्ह्यात सहावा क्रमांक, महाराष्ट्र राज्यात अकरावा क्रमांक आला आहे. आरोही ने 150 पैकी 130 गुण मिळवले आहेत.अवनीश अनंत खाडे इयत्ता दुसरी या विध्यार्थ्याने 150 पैकी 118 गुण मिळवून इंदापूर केंद्रात सहावा,पुणे जिल्ह्यात बारावा तर महाराष्ट्रात सतरावा क्रमांक मिळवला आहे. तसेच शिवन्या सतीश शिंदे इयत्ता चौथी या विध्यार्थिनीने 300 पैकी 232 गुण मिळवून इंदापूर केंद्रात 14 वा,पुणे जिल्ह्यात 30वा तर महाराष्ट्रात 35 वा क्रमांक मिळवला आहे. या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे गावातील नागरिक, पालक, शिक्षक यांच्याकडून कौतुक होत आहे.

