shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव परिसरातील खंडित वीजपुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत..

लोकशाही मूल्यांची पायमल्ली;सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प नावालाच...

खंडीत वीज पुरवठ्याबाबत स्थानिक पुढारी शब्दही बोलत नाहीत...

वाळकी (प्रतिनिधी) : अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव ससे टेकडी,धावडे वाडी,चौधरवाडी, कुताळमळा, हराळमळा,कोरेगाव हद्दीलगतील वस्ती परिसरातील विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
         उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात रात्रीच्या वेळी अचानक वीज जाण्याचे प्रकार वाढले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना याचा अधिक फटका बसत आहे.या परिसरातील कायमच वीज खंडित होण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे उकाडा,रानटी जनावरांचा वावर वाढत असून लोकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

           यातच लाखो रुपये खर्च करून गुंडेगाव येथील शासकीय गायरान जागेवर गुंडेगाव ग्रामसभेने सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असताना म्हटले आहे की गावात होणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पातून ३ मेगावॉट वीज ही शेतकऱ्यांना चोवीस तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.व तशा त्यांनी सदर कंपनीच्या प्रशासनाला आपल्या अटी व शर्तींसह करार केला आहे.तर मग ही निर्मिती झालेली वीज नेमकी कोणाला दिली जाते हा एक मोठा प्रश्न नागरिकांना पडला असून याचा फायदा नेमका कोणाला हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे.याबाबत महावितरण विभागाने तात्काळ दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.अन्यथा या भागातील लोकांनी आता थेट इशारा दिला असून या विद्युत पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.


उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच गेल्या काही महिन्यांपासून गुंडेगाव परिसरातील वाडी वस्तीवर वेळी अवेळी वीजपुरवठा कोणत्याही पूर्वसूचना न देता खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी यांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्यामध्ये नियोजन शून्य झालेला असून महिन्यांपासून अनेक वेळा वीज खंडित होत आहे. यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी, वीजपुरवठा कर्मचारी यांच्याकडे केल्या आहेत.लवकरच यावर उपाययोजना न झाल्यास महावितरणला निवेदनाद्वारे तीव्र आंदोलनाचा इशारा देणार आहे.

संजय भापकर - युवा सामाजिक कार्यकर्ते.
close