जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकांचे निकाल लागले. मतदारांनी १५ वर्षे सत्ता सांभाळणाऱ्या ममतादीदींना घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र ममतादीदींना हा निकाल मान्य नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही आणि संघर्ष करणार असा निर्धार जाहीर केला आहे.
ममतादीदींचा आणि त्यांच्या पक्षाचा अनपेक्षित रित्या दारुण असा पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांना धक्का बसणे आणि नैराश्य येणे सहाजिकच आहे. त्या नैराश्यात ममतादीदी असा आक्रस्थळा निर्णय जाहीर करू शकतात. तो त्यांचा स्वभावगुण आहे. खरे तर यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना सावरायला हवे. मात्र त्यांचे मित्रही त्यांच्याच सुरुवात सूर मिसळत आहेत. हा आणखी एक विनोदच म्हणावा लागेल.
मतदारांनी घरचा रस्ता दाखवल्यावरही मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही असे म्हणणे ही शुद्ध मुजोरी आहे, आक्रस्तळेपणा आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हा निकाल मॅनेज केला असा ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे. मात्र नुसता हवेत आरोप करण्याऐवजी त्यांनी तो सिद्ध करायला हवा. त्यासाठी त्यांना न्यायालयाचे दरवाजे मोकळे आहेत. तसे न करता मी राजीनामा देणार नाही अशी मुजोरी करणे हे घटनाबाह्य वर्तन ठरू शकते. घटनेतील तरतुदीनुसार त्यांनी राजीनामा दिला नाही तरी ७ मे २०२६ रोजी त्यांच्या विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे त्या मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकत नाहीत. तरीही त्यांनी हट्ट केलाच तर घटनेतील तरतुदीनुसार राज्यपाल त्यांना त्या पदावरून बाजूला करू शकतात. आणि प्रसंगी राज्यपाल सरकार बरखास्त देखील करू शकतात. ममतादीदींना बहुदा हेच हवे असावे. म्हणजे त्याचा मुद्दा करून सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रकार पुन्हा एकदा करता येईल, अशी त्यांची अपेक्षा असावी.
दणदणीत पराभवामुळे झालेला ममतादीदींचा सात्विक संताप आपण समजू शकतो. पण त्यांच्या मित्रांनी तरी त्यांना समजावायला हवे. मात्र वृत्तवाहिन्यांच्या बातमीनुसार समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी कोलकात्यात पोहोचत असल्याचे सांगण्यात आले आहे. भरीस भर महाराष्ट्रातल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील भाजपचा हा विजय बेकायदेशीर असल्यामुळे ममता बॅनर्जी जे काही करत आहेत ते योग्यच असल्याचा फालतू दावा केला आहे. म्हणजे ममता बॅनर्जी एक मूर्ख तर संजय राऊत सात मूर्ख असाच हा प्रकार झाला.
लोकशाही व्यवस्थेत मतदारांचा कौल हा अंतिम असतो. हा कौल ठरवण्याचे अंतिम अधिकार निवडणूक आयोगाचे आहेत. त्यांनी निकाल दिल्यावर त्यातही तुम्हाला काही गडबडी वाटल्या तर न्यायालयात दाद मागता येते. मात्र तसे न करता मी मुख्यमंत्रीपद सोडणार नाही असा हट्ट करणे हा शुद्ध पोरकटपणा झाला आहे. एखाद्या लहान मुलाने शेजारच्या घरचे एखादे खेळणे उचलून घ्यावे आणि ते आपले नसताना देखील ते मी आता देणार नाही असा हट्ट करण्यासारखाच हा प्रकार झाला आहे. या पोरकट हट्टाला समर्थन देणाऱ्या संजय राऊत आणि अखिलेश यादव यांच्याही बुद्धीची किंवा करावीशी वाटते.
या निमित्ताने इंडिया आघाडी पुन्हा एकदा मजबूत करण्याचा निर्धार ममता बॅनर्जी यांनी जाहीर केला आहे. त्याला कोणाचा आक्षेप असायचे कारण नाही. कारण लोकशाही त प्रत्येकाला आपला पक्ष किंवा आपली आघाडी मजबूत करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र इंडिया आघाडीत स्वतः ममता बॅनर्जींसह किमान आठ ते दहा नेते पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. त्या सर्वांचा क्रमांक एकदा ठरवून घ्यावा, आणि प्रत्येकाने किती काळ पदावर राहावे ते ठरवावे, मगच आघाडी मजबूत करावी असा प्रेमाचा सल्ला मतादीदींना द्यावासा वाटतो...
अर्थात हे माझे मत झाले...
तुमचे स्पष्ट आणि परखड मत तुम्ही देखील मांडू शकता..

