कुर्ला प्रतिनिधी:-
कुर्ला येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात साहित्य संवेदना आणि ज्येष्ठ नागरिक संघ, कुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्पर्धात्मक काव्य संमेलन २ मे २०२६” हा बहुचर्चित साहित्यिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंदा आसवले श्री कौस्तुभ काटे नियोजित पदाधिकारी अंतर्गत
उत्तम काव्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून आदरणीय जेष्ठ कवी श्री. दुर्गेश सोनार यांनी मार्गदर्शन केले. तसेच परीक्षक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते साहित्यिक श्री. खंडू माळवे, कवी श्री. प्रसाद भावे आणि कवियत्री सौ. ऐश्वर्या डगांवकर यांनी जबाबदारी पार पाडत उत्कृष्ट परीक्षण केले.प्रमुख उपस्थित जेष्ठ नागरिक संघाचे सभासद आणि काव्यरसिकांनी जोरदार हजेरी लावून कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमादरम्यान श्री. पांडुरंग मोहिते यांनी संवेदना फाउंडेशनच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती देत संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.
या स्पर्धेत एकूण २९ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या उत्कृष्ट काव्यरचना सादर केल्या. सर्व सहभागी कवी-कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली:
प्रथम क्रमांक: श्री. तुषार देशमुख
द्वितीय क्रमांक: सौ. सुजाता घाटगे
तृतीय क्रमांक: सौ. मिनल शेकटकर
उत्तेजनार्थ पारितोषिक:
१. श्री. गौषपाशा शेख
२. सौ. गौरी आठल्ये
कार्यक्रमादरम्यान उपस्थित रसिकांनी काव्यरसाचा मनमुराद आनंद घेतला. अध्यक्षीय भाषणातून श्री. दुर्गेश सोनार यांनी साहित्याची समाजघडणीतली भूमिका अधोरेखित केली, तर परीक्षकांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे कौतुक करत मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी संवेदना फाउंडेशनच्या आयोजकांनी केलेल्या नियोजनाचे सर्व जत स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.

