प्रतिनिधी मोहन शेगर सोनई
नेवासा तालुक्यातील गणेशवाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल १८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन वाहने जप्त करण्यात आली असून पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघे आरोपी फरार झाले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २६ मे रोजी सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनई-गणेशवाडी शिवारात चारचाकी वाहनातून वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने गणेशवाडी परिसरात सापळा रचून कारवाई केली. यावेळी एमएच २० ईएल ७९९०, एमएच १६ एई ३२३५ तसेच एक विनाक्रमांक वाहन अशा तीन वाहनांमधून शासनाची वाळू कोणताही परवाना नसताना
बेकायदेशीररित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी वाळूसह वाहने असा एकूण १८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादीवरून किरण बाबासाहेब सिसोदे (वय २५, रा. खलाल पिंपरी), विवेक दत्तात्रय शिंदे (वय १९, रा. निपाणी निमगाव), आकाश तांबे (रा. पानेगाव, फरार), बाळासाहेब पुंडलिक नळगे (वय ४२, रा. बहिरवाडी) आणि राजू सुपनर (रा. अंमळनेर, फरार) यांच्या विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा

