shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल. जी. बनसुडे विद्यालय पळसदेव येथील इयत्ता १० वी इंग्रजी व सेमी माध्यमाचा १०० टक्के निकाल.

एल. जी. बनसुडे विद्यालय पळसदेव येथील इयत्ता १० वी  इंग्रजी व सेमी माध्यमाचा १०० टक्के निकाल.
इंदापूर: गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालय, पळसदेव येथील इयत्ता १० वी  इंग्रजी व सेमी माध्यमाने मार्च २०२६ मध्ये झालेल्या एस.एस.सी. परीक्षेत शंभर टक्के निकालाची नोंद करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  उत्कृष्ट कामगिरी करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
इंग्लिश विभागातील गुणवंत विद्यार्थी :
१. बनसुडे जान्हवी नितीन-94.00
२. झणझणे वैभवी विजय- 92.00
३. गायकवाड सिद्धी महेंद्र-86.60
सेमी विभागातील गुणवंत विद्यार्थी :
१. देवकाते सृष्टी सुनील-91.40
२. कन्हेरकर सिध्दी सतिश-81.80
३. देवकाते सार्थक शहाजी-81.20
या यशामध्ये विभागप्रमुख  प्रविण मदने,  नवनाथ माळवदकर, विद्या पोटे,अनिता मखरे,सारिका चितळकर, ऋषिकेश गंगणे, वैभव काळे व संदीप आढाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत (नाना) लक्ष्मण बनसुडे, उपाध्यक्ष डॉ. शीतलकुमार शहा, कार्याध्यक्षा सौ. नंदाताई (नानी )हनुमंत बनसुडे, सचिव श्री. नितीन दशरथ बनसुडे, प्रिन्सिपल सौ. वंदना बनसुडे, मुख्याध्यापक श्री. राहुल वायसे, उपमुख्याध्यापक सौ. सुवर्णा वाघमोडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या उल्लेखनीय निकालामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध अध्ययनपद्धती व शिक्षकांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
close