*इंदापूरच्या आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ८२.३५ टक्के*
*इंदापूर:(दि.९)* : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा शुक्रवारी (दि.८) ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून. मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल शेकडा ८२.३५ टक्के एवढा लागला आहे. अशी माहिती मुख्याध्यापिका अनिता साळवे - मखरे यांनी दिली
आश्रमशाळेतून परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी ५१,
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ४२.
प्रथम १)कु.अक्षता शिरगिरे - ८४.४०% (२) कु. माधुरी कडवळे - ८२.८०% (३) कु. गीतांजली सुतार - ७३.८०% यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.
आश्रमशाळेत मुलींनीच बाजी मारली आहे. या यशाबद्दल मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आश्रमशाळेच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, सचिव ॲड.समीर मखरे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

