श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जनसेवा प्रतिष्ठान अहिल्यानगर यांचे वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये महाले पोद्दार इंग्लिश मीडियम ची विद्यार्थिनी आर्या भाऊसाहेब लोंढे हिने ८१.३३ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर तिची विज्ञान कार्यशाळा व इस्रो सहलीसाठीही निवड झालेली आहे.
आर्या ही रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल खंडाळा येथील उपशिक्षक भाऊसाहेब लोंढे व कै. अनिल दिगंबर मुळे विद्यालय येथील उपशिक्षिका जयश्री लोंढे यांची कन्या आहे.
आर्याच्या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

