*पॅंथर रत्नाकर (तात्या) मखरे  यांना जयंतीदिनी अभिवादन*
*इंदापूर* (दि.१०): माजी नगराध्यक्ष,मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत पँथर रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.९) भिमाई आश्रमशाळेत अभिवादन करण्यात आले.
यावेळी शकुंतला (काकी),मखरे संतोष मखरे, ॲड.समीर मखरे व कुटुंबीयांच्या प्रमुख उपस्थितीत दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या समाधीस्थळी त्रिशरण, पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत मखरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 
दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या जीवनावर विद्यार्थीनींनी चारोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक,राजकीय व शैक्षणिक कार्याला उजाळा दिला.
प्रा. कृष्णा ताटे, नानासाहेब चव्हाण, ॲड. राहुल मखरे यांची भाषणं झाली.
यावेळी विलास शिंदे,गोरख तिकोटे, विजय खामगळ सत्यवान भोसले,युवराज बन, सूरज धाईंजे,तेजस मखरे आदींसह संस्थेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
 सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर आभार मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी मानले.