दुष्काळाचे सावट संपुन माझा शेतकरी राजा सुखी होऊ दे - अनिता खरात
तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने इंदापूर शहरातील सर्व गणेश मंडळांना भेटून सर्व गणरायांना अंगवस्त्र अर्पण .
इंदापूर: आज बारा दिवस बप्पांची सेवा केल्यानंतर गणपती बप्पा निघाले तसं तर रोजची आरती दररोजचा आनंद उत्सव आज शांत होणार म्हणून मनातून वाईट वाटते परंतु परंपरेनुसार बप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने इंदापूर शहरातील सर्व गणेश मंडळांना भेटून बप्पांचे दर्शन घेतले. तसेच मंडळातील सर्व गणरायांना अंगवस्त्र अर्पण केले.
यावेळी बप्पांच्या चरणी लीन होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडू दे आणि दुष्काळाचे सावट संपू दे आणि माझा शेतकरी राजा सुखी होऊ दे अशी गणराया चरणी प्रार्थना केली.
तसेच सर्वच मंडळातील गणेश भक्तांना विनंती केली की, आज गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आपण शांतता संयम राखावा. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याचीही नोंद घ्यावी .तसेच लहान मुले, महिला या आवडीने मिरवणूक पाहण्यासाठी येत असतात या सर्वांची काळजी घेऊन आपण मिरवणूक काढावी .
यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे रुपेश वाघमोडे, विशाल म्हेत्रे, अभिजीत रेडके, युनूस मुलानी ,सद्दाम बागवान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

