shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये : डॉ.नरेंद्र होन



शिर्डी | प्रतिनिधी |

                  डाॅ.नरेंद्र होन यांच्याविषयी समाजातील काहि समाजकंटकांनी अफवा पसरविल्यामुळे शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधीशी आपले मनोगत व्यक्त करतांना जनतेला आवाहन केले आहे की, 


      सप्रेम नमस्कार ,मी डॉ. नरेंद्र होन आपल्या परिसरातील  सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की,देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाची महाभयंकर साथ असल्यामुळे उगीच साधा आजार असला तरी बाहेर पडू नये आणि विशेष म्हणजे कोरोना आजार बद्दलच्या अफवा इतरत्र पसरू नये. काल परवा पासून डॉक्टर नरेंद्र होन हे दुबईहुन  आले असल्याची चर्चा पोहेगांव परिसरात चालू आहे.काही विघ्नसंतोषी लोक विनाकारण अफवा पसरवून दिशाभूल करतात.मी अजून पासपोर्टच बनविला नाही तर दुबईला जाण्याचा प्रश्र कुठे निर्माण होते. कृपया करून अशा फेक चर्चाचा कुणीही विचार करू नका मी माझ्या परीने वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे.काल व आज मी स्वतः दवाखाना बंद ठेवला आहे. परंतु इमर्जन्सी पेशंट साठी मी केव्हाही उपलब्ध असतो. मला फोन करून तुम्ही बोलावू शकता.
                  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. असे डॉ.होन यांनी निवेदनात म्हटले आहे व ओम गुरुदेव हॉस्पिटल, पोहेगाव आपल्या सेवेसाठी सदैव कार्यरत आहे असे ही ते म्हणाले आहे.
close