shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेवारस मयताची ओळख पाटविण्‍याचे आवाहन



       अहमदनगर दि.26- 
       नगर तालुका पोलिस स्‍टेशनच्‍या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळून आले असून संबधीतांच्‍या नातेवाईकांना ओळख पटविण्‍याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार नगर तालुक्‍यातील अरणगाव येथे अंदाजे  70  वर्षे वयाच्‍या पुरुष इसमाचा मृतदेह 20 मार्च 2020  रोजी आढळून आला . या मयतांचे नाव व पत्‍ता तसेच त्‍यांच्‍या वारसाचा शोध न लागल्‍याने नगर तालुका पोलिस स्‍टेशनने  या संदर्भात नागरिकांना माहिती कळविण्‍याचे आवाहन केले आहे.


            तसेच वय 45 वर्षाचे एक बेवारस मयत 24 फेब्रुवारी 2020 रोजी  मयत झाले आहे.  या मयता संदर्भात कोणाकडे काही माहिती असल्‍यास नगर तालुका पोलिस स्‍टेशन, अहमदनगर येथे  संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक अहमदनगर  यांनी केले आहे.
close