shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाॅकडाऊनच्या कालावधीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या क्रिकेट खेळाडूंवर माणगांव पोलीसांची कारवाई



      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) 
             कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह राज्यात सर्वत्र लाॅकडाऊन संचारबंदी असताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेताअत्यंत बेजबाबदार पणे क्रिकेट खेळणार्‍या माणगाव तालुक्यातील डोंगरोळी गावांतील ०९ जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



        माणगांव पोलीसांनी शुक्रवार, दिनांक २७ मार्च रोजी सायंकाळी सदरची कारवाई केली आहे त्यामुळे माणगांव तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना पोलीसांच्या या धडक कारवाई मुळे चांगलाच वचक बसला आहे. 

       या घटनेची सविस्तर माहिती अशी की, गुरूवार दिनांक २६  मार्च रोजी सायंकाळी ४: ०० वाजता डोंगरोली गावातील ०९ जण हे श्री. नथुराम पाखड यांच्या शेतामध्ये क्रिकेट खेळत होते.  

        जिल्हाधिकारी रायगड यांच्या कोरोना विषाणूचा संक्रमण आणि संसर्ग थांबविण्यासाठी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन  केल्या प्रकरणी या नऊ जणां विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम १८८,२६९, २७० महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(३) १३५  याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे हे करीत आहेत. लाॅकडाऊनच्या अत्यंत महत्त्वपूर्ण संचारबंदी कालावधीत अत्यंत बेजबाबदार वर्तन करून क्रिकेट खेळणार्या या नऊ खेळाडूंवर माणगांव पोलीसांनी केलेल्या धडक कायदेशीर कारवाई मुळे माणगांव तालुक्यासह ग्रामीण भागातील सर्व क्रिकेट खेळाडूंना चांगलाच वचक बसला आहे.
close