अहमदनगर दि. 23 - जिल्हयातील अहमदनगर महानगरपालीका, सर्व नगरपालीका, नगरपंचायत व अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे हददीमध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी सर्व खाजगी वाहने व खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनांना ३१ मार्चपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगरआणि श्रीरामपूर यांचे अधिनस्त सर्व मोटार वाहन निरीक्षक, सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व सर्व वाहन चालक यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. करीत आहे. त्यांनी मा.जिल्हाधिकारी यांचेव्दारे वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे.
हा आदेश खालील बाबतीत लागू होणार नाही. -
सर्व शासकीय सेवांशी निगडीत वाहने. रुग्णवाहीका, अग्नीशमन वाहने, वैदयकीय उपचारासाठी लागणारे वाहने. (पुराव्यासह), सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना यांचे अधिकारी व कर्मचारी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्यांसह), आजारी व्यक्ती तसेच रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणि संबंधित पुराव्यांसह), प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारची दैनिक/नियतकालीके/टिव्ही न्युज चॅनेल इ.) यांचे कर्मचारी व प्रतिनिधी यांची वाहने (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्यांसह), दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणा-या आस्थापनांकडील वाहने तसेच त्यांचे अधिकारी/ कर्मचारी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्यांसह), भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले. एस.टी महामंडळ व अहमदनगर महानगरपालीका यांचेकडील बसेस. अहमदनगर जिल्हयातील महानगरपालीका, नगरपालीका/नगरपंचायत व अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतून जाणारे राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील मालवाहतूकीची वाहने. (मात्र मालवाहतूक करणा-या वाहनातील प्रवासी वाहतूक प्रतिबंधित राहील.)
कोणतीही व्यक्ती संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केलयास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कमल 188 नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.


