shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना: बुलढाण्यात मृत्यू झालेला महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह


  • राज्यात कोरोनाचा आठवा बळी; बुलढाण्यात मृत्यू झालेला महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह.
  • कोरोना विषाणूमुळे राज्यात आठवा बळी गेला आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, राज्यात आत्ताच्या घडली 196 कोरोनाचे रुग्ण आहेत.


बुलढाणा :
          कोरोनाचे संकट आता शहरातून पार खेड्यापर्यंत पोहचलं आहे. बुलढाणा  जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये शनिवारी सकाळी ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीचा अवघ्या तासाभरातच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुलडाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये गेल्या तीन दिवसांपूर्वी त्याच्यावर उपचार होते सुरू. त्याचा निमोनिया अधिक वाढत गेला. त्यामुळे त्याची प्रकृती ढासळली होती. परिणामी राज्यात आतापर्यंत बळींची संख्या आठ झाली आहे.




प्रकृती खालवल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे तो आयसोलेशनमध्ये असतानाच तासाभरात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याचे स्वॅब नमुने तातडीने नागपूर येथे विषाणू तपासणी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आज आला असून तो रुग्ण पॉझिटिव्ह निघाला होता. याअगोदर एका 40 वर्षीय महिलेचा मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल शनिवारी या माहिलेला छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनानं 5 बळी घेतले आहेत. तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून मुंबईत उपचारासाठी आलेल्यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

close