shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवडमधील आणखी ५ ‘कोरोनामुक्त’ रूग्णांना दिला ‘डिस्चार्ज’


 पिंपरी-चिंचवड, पुणे, 
          पिंपरी चिंचवड शहरातील ३ कोरोनाबाधित रुग्ण दोन दिवसांपूर्वी ठणठणीत बरे झाले होते. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये दिलासादायक वातावरण असून १४ मार्च रोजी दाखल केलेले ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचे दुसऱ्या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.




पिंपरी चिंचवड शहरात १२ मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले होते. त्यापाठोपाठ रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. चार दिवसांत एकूण १२ रुग्ण कोरोना ‘पॉझिटीव्ह’ आढळल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर १४ दिवस उपचार घेतलेले रुग्ण ‘कोरोनामुक्त’ व्हायला सुरुवात झाली. त्यापैकी पहिले ३ रुग्ण शुक्रवारी ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले होते, त्यांना घरी सोडण्यात आले. रविवारी (दि.२९) आणखी पाच रुग्णांचे १४ दिवसांनंतरचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना घरी सोडले आहे.


या रुग्णाच्या घशातील द्रावाचे नमुने दुस-यांदा तपासणीसाठी ‘एनआयव्हीकडे’ पाठविण्यात आले होते. या दुस-या तपासणीत देखील त्यांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले आहेत. हे पाच रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. त्यामुळे या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असून आता केवळ ४ रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण ठणठणीत होत असल्याने ही सर्वांत मोठी शहरवासीयांना दिलासा देणारी बाब मानली जात आहे. मागील आठ दिवसांपासून शहरात एकही नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे. शहरात कोरोनाचे नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळत नसले. तरी, नागरिकांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. वारंवार हात धुवावेत. सूचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.
close