- काही ठिकाणी सोशल डिस्टनचे तीन तेरा
- ग्रामीण भागात जनतेला लाॅकडाऊनचा अर्थच कळला नाही, त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी
कोपरगाव | राज गडकरी। दि.३०
कोरोनोचा चा संसर्ग होऊ नये व त्याच्या मुकाबल्यासाठी देशभर 21 दिवस लॉक डाऊन असून या लॉकडाऊन मुळे नेहमी रात्रंदिवस देश-विदेशातील साई भक्तांनी गजबजलेली श्री साईंची शिर्डी सध्या ठप्प असून सर्वत्र शुकशुकाटक दिसत आहे, अत्यावश्यक सेवा व गळता सर्व दुकाने, ट्रॅव्हल्स, बसेस बंद असून देशातील मंदिराप्रमाणे श्री साईबाबा समाधी मंदिरही सन 1940 नंतर या परिस्थितीत 17 मार्चपासून दु,३ नंतर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे, शिर्डीत प्रथम च इतका सन्नाटा दिसत असून रस्ते ओस पडले आहेत, शिर्डीत राज्य व परराज्यातून येणाऱ्या एसटी बसेस ,राज्यातून, देशातून येणाऱ्या रेल्वे, तसेच विमाने ही बंद आहेत, त्यामुळे शिर्डी बस स्टँड, साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक व श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळही सुने सुने दिसत आहे , शिर्डीत दररोज सुमारे सोळा ते सतरा विमाने वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून येत असतात, मात्र सध्या एकही विमान येत नाही ,शिर्डी शहरातून जाणारा नगर मनमाड महामार्ग सुद्धा ओस पडला आहे, श्री साईबाबा संस्थानने आपले प्रसादालय व भक्त निवासे ही बंद केले आहेत.
परंतु येथील आरोग्य पोलीस कर्मचारी व रुग्णालयातील नातेवाईक , गरजूंना नाश्ता भोजन देण्याची व्यवस्था साई संस्थांनी केली आहे, श्री साईबाबा संस्थान तर्फे नुकतेच चिवड्याची व बुंदीची पाकिटे पोलिसांसाठी पाठवण्यात आली आहे ,तसेच कालच कर्नाटक मधून राज्यस्थान कडे जाणाऱ्याअडीच हजार मजुरांसाठी संस्थाने त्यांना नाश्ता पाकिट व भोजन देऊन मोठी मदत केली आहे, सर्वत्र लॉक डाऊन मुळे शुकशुकाट असताना शिर्डी बस स्थानकावर मात्र येणारे जाणारे लोक दिसत आहे, शिर्डी परिसरातील गावे व वाड्या-वस्त्यांवर सकाळ, संध्याकाळ दुध डेअरी यांवर शेतकऱ्यांची, दूध उत्पादकांची थोडीफार गर्दी दिसून येत आहे, किराणा दुकानात काहीतरी खरेदीसाठी बहाना करत लोकबाहेर येत असून अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क किंवा सोशल डिस्टंस, दक्षता घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे, शहरात लॉक डाउन पाळला जात असला तरी शिर्डी परिसरातील काही गावे खेडे वाड्या वस्त्या यावर या लॉक डाऊन चा म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही, लोक दिवसभर घरात असले तरी सायंकाळी काही लोक दूध घालण्याच्या किराणा घेण्याच्या बहाण्याने बाहेर दिसतात, पोलिसही सकाळी आपल्या पोलिस वाहनांमधून मधून स्पीकर लावून गर्दी करू नका, मास्क लावा म्हणून सांगतात, सकाळी एकदा फेरी मारल्यानंतर परत त्यांचाही चक्कर होत नाही, ग्रामीण भागात सर्वत्र हीच परिस्थिती सध्या दिसून येते आहे.
ग्रामीण भागात सध्या गहू ,मका ज्वारी काढण्यासाठी आल्याने व मजूर मिळत नसल्याने ग्रामीण भागातले शेतकरी हार्वेस्टर, मशीनद्वारे किंवा घरातील कुटुंबातील सदस्यांना घेऊन शेतात जाऊन काम करत आहे, पिके सोंगत आहेत, काही शेतकरी शेतातून काढलेले कांदे गोण्यांमध्ये भरण्याचे काम करत आहे, तर कोणी द्राक्षे काढण्याचे काम करताना दिसून येत आहे, अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसत असून लॉक डाऊन शहरात आहे तसाच तो ग्रामीण भागातही असला तरी शेतीत काम करणारे हे आपल्या कामात मग्न आहेत, वाड्या-वस्त्यांवर शेतीत दुर दुर असणारे मळ्यामध्ये लॉक डॉऊनचा प्रभाव फारसा दिसून येत नाही, शिर्डी नगरपंचायत जंतनाशक फवारणी आपल्या शहरांमध्ये गल्लोगल्ली करत असून मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात येत आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात सरपंचाच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्याचे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी एस एस पाटील यांनी आदेश दिले असतानाही शिर्डी परिसरातील अनेक गावात अजूनही अशा कमिट्या स्थापन झालेल्या दिसून येत नाही, तसेच काही गावात व वाड्या-वस्त्यांवर अजूनही जंतनाशक फवारणी करण्यात आली नाही, गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी या भागात ढगाळ वातावरण व पाऊस झाल्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली व साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून या भागात जंतनाशक फवारणी करणे आवश्यक आहे, ग्रामीण भागात दुध डेअरी यांवर, किराणा दुकान वर किंवा भाजीपाला घेण्यासाठी येणारे लोक या लॉकं डाऊन काळात सुद्धा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दक्षता म्हणून जे नेम पाळवायची आहेत ते पाळताना दिसत नाही ,अनेकदा मास्क किंवा सोशल डिस्टन्स ठेवत नाही, ग्रामीण भागात गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत अनेक ज्येष्ठ नागरिकही व्यक्त करत आहेत, शिर्डीत दररोज फुलांचा बाजार भरत असतो मात्र लॉक डाऊन मुळे हा फुलांचा बाजार बंद आहे, शिवाय शिर्डी बंद असल्यामुळे फुले विकत नाहीत व शिर्डीत येत नाही , त्यामुळे शिर्डी परिसरातील फुल उत्पादकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे, शिर्डी परिसरात हजारो एकर गुलाब, गलांडा झेंडू ,गुलछडी आदींचे बागा असून फुलेही वेळीच तोडणे गरजेचे असते, नाहीतर त्याचा उपयोग होत नाही, सध्या ही फुले रस्त्यावर किंवा शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे, तरीही शासनाने फुल उत्पादकांना मदत करणे गरजेचे आहे असे फूल उत्पादक बोलत आहेत.


