भुसावळ | प्रतिनिधी :-
शहरात पुन्हा कोरोनाच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.दिवसे न दिवस रुग्णाची संख्या वाढत आहे.शिंधी कॉलनी भागातील पान मसाला विक्री करणारा एका पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने संख्या दोन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसराला सील केले आहे.
शिंधी कॉलनी भागात दुसरा रुग्ण मिळाल्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सर्व परिसराची पाहणी केली.तसेच घटनास्थळी मा.उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने,तहसीलदार दिपक धिवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,मुख्याधिकारी करुणा डहाळे, बा.पो.स्टे.नि दिलीप भागवत यांच्यासह तहसील व नगरपरिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली.व तसेच वांजोळा रोड, गजानन महाराज मंदिर,राजस्थान मार्बल, सुहास हॉटेल, आनंद नगर, गंगाराम प्लॉट,नाहाटा कॉलेज ते अष्टभुजा मंदिर पर्यंतचा परिसराला 14 दिवसापर्यत सील करण्यात येणार आहे.सील करण्यात येणाऱ्या परिसरातील नागरिकांना घराबाहेर येण्यास बंदी आहे.तसेच जीवनावश्यक वस्तू मधील मेडिकल सुरू राहणार असून सर्व मार्केट बंद राहणार आहे.आधी माहिती उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिली आहे.