shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र भगवान धुळे आणि विद्यमान नगरसेविका अ‍ॅड. सौ .मिनल राजेंद्र धुळे यांच्या कडून जुवेली, मानकवली परिसरातील 1800 लोकाना जीवनावश्यक वस्तू ,तसेच मास्क व सँनिटायझर चे वाटप

बदलापूर (जाफर वणू)
बदलापूर पुर्व परिसरातील प्रभाग क्रमांक 44 आणि 47 मध्ये भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र भगवान धुळे आणि प्रभाग क्रमांक 44 च्या विद्यमान नगरसेविका मिनल राजेंद्र धुळे यांच्याकडून गोरगरीब गरजुवंताना मोफत जीवनावश्यक वस्तु, मास्क व अन्नधान्य वाटप करण्यात आले होते. 





कोरोनासारख्या भयंकर रोगाने संपूर्ण देशात व राज्यभरात धुमाकुळ घातली असून दि. 24 मार्च पासून सरकारने लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यापासुन घरीचराहून अडचणीत सापडलेल्या गोरगरीब गरजुवंतावर उपासमारीची वेळ आली असतानाच या बाबत दखल घेवुन भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र भगवान धुळे व त्यांची पत्नी भाजप विद्यमान नगरसेविका अ‍ॅड. सौ. मिनल राजेंद्र धुळे आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीधर धुळे ( ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे - अध्यक्ष) यांच्यावतीने खरवई, मानकवली, जुवेली परिसरातील 1800 गरजुवंताना जीवनावश्यक वस्तू तसेच मास्क, आणि सँनिटायझर वाटप केले असून परिसरातील नागरिकांना सोयिस्कर असा भाजीपाला देखील उपलब्ध करून दिला आहे.

त्याच बरोबर वार्ड क्र. 44 व 47 येथील नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सरकारकडून लॉकडाउन घोषित झाल्यापासून भाजप माजी नगरसेवक राजेंद्र भगवान धुळे व 44 चे विद्यमान नगरसेविका मिनल राजेंद्र धुळे यांनी येथील गोरगरीब नागरिकांना पहिले प्रथम मास्क व सँनिटायझर त्यानंतर जीवनावश्यक वस्तुंच्या स्वरुपात मदत केली. तसेच विभागात कीटनाशक औषध फवारणी करण्यात येते. त्यामुळे विभागातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
close