येवला|प्रतिनिधी-(संतोष राऊळ):
नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यात प्रथम कोरोना रुग्ण आढळून आल्याने शहरात चिन्तेचे वातावरण झाले आहे. येवले शहरात या आधी संशयित म्हणून काही नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या परंतु आतापर्यंत सर्व संशयित हे निगेटिव्ह असल्यामुळे शहरात काही ठिकाणी शिस्तीचे पालन होत होते तर काही ठिकाणी मात्र नागरिक सुरक्षेची काळजी न घेता घराबाहेर पडायचे तसेच शहरातील काही भागात नेहमी वर्दळ दिसायची. पण आता येवले शहरात एक महिला रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने देखील शहरात सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली आहे.
यालाच अजून एक कारण म्हूणन सदर महिलेचे कोरोना हॉटस्पॉट म्हणून चर्चिल्या जाणाऱ्या मालेगाव या शहराशी काही कारणास्तव संपर्क झाल्याची देखील चर्चा आहे.
तसेच येवले नगरपालिकेने देखील याची विशेष दखल घेतली असून विविध माध्यमांद्वारे नागरिकांन मध्ये जनजागृती करण्याचे कार्य चालू आहे.