shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लॉकडाऊन जिल्ह्यात। शांतता गावागावात। आनंद घेऊ घरात।। अडचणींवर करू मात। पण कोरोनाचा नायनाट करू देशात।।


अहमदनगर (राजकुमार गडकरी)
       देशात, राज्यात  भयंकर अशा कोरोना विषाणूमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे, या कोरोनामुळे जगात हाहाकार उडाला आहे.त्यामुळे श्रीमंत व स्वतःला महासत्ता समजणारे देशही हतबल झाले आहेत, अशा परिस्थितीत आपल्या भारत भूमीमध्ये सुद्धा या कोरोनाने  शिरकाव केला आहे, अशा कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आपल्या भारत देशात वेळेत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला .अश्या 25 मार्चपासून सुरू झालेल्या 21 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये व त्यानंतर तीन मेपर्यंत वाढलेल्या या लॉक डाऊन मध्ये पहिल्यांदाच 135 कोटी लोकसंख्या असणाऱ्या या भारत देशातील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व उद्योग ,काम, धंदा बस, रेल्वे ,विमान सर्व काही बंद आहे, रस्ते ओस आहे ,सर्वजण आपापल्या घरात आहेत, अशा परिस्थितीमुळे देशात ,राज्यात,  सर्वत्र शांत, शांत आहे.
        


      अश्याच परिस्थितीत अहमदनगर जिल्हा तरी कसा गजबजलेला राहणार श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने, श्री शनिदेवाच्या पावनभूमीने ,मेहेरबांबाची पुण्यनगरी असणाऱ्या,  ज्ञानेश्वरी लिहिली असे तीर्थस्थान नेवासा असणाऱ्या,संत श्री चांगदेव महाराज, संत जनार्दन स्वामी महाराजांच्या साधू असणाऱ्या व। सर्वाधिक  सहकारी साखर कारखाने असणाऱा,  राजकीय क्षेत्रात राज्यात सर्वात आघाडीवर असणारा  व  राज्यात सर्वाधिक क्षेत्रफळाने मोठा असणारा माझ्या ह्या अहमदनगर जिल्ह्याची , पवित्र गोदावरी ,प्रवरामाई ,मुळा आदी पावन नद्यांनी पुण्यवान झालेली  हि भूमी, रात्रंदिवस गजबजलेली, साई नामाचा जयजयकार एेकणारी, नेहमी साईभक्तीची गीते, श्री शनी देवाचा जयघोष एेकणारी , विविध ठिकाणी  धर्मिक  कार्यक्रम, प्रवचन,  किर्तन , सुरु असलेली  ही जिल्हा भूमी , सर्वत्र कारखान्यांची, वाहनांची, लोकांची धावपळ ,वर्दळ, गडबड सारखी रात्रंदिवस सुरूच मात्र प्रथमच कानाला ऐकायला आला ऩाहीअसा शब्द,तो म्हणजे लॉकडाऊन, प्रत्यक्ष अनुभवाला मिळणारे लॉकडाऊन व त्याचे नियम व त्यामुळे सर्व शांत शांत झालेले जिल्ह्यातील शहरे ,गावे, खेडे, सर्वच ही जिल्हा भूमी सुनी सुनी, हे पाहूनच सर्वजण आता  शांत शांत झाले आहे,  बस, रेल्वे, विमाने ,कारखाने ,बांधकामे, दुकाने सर्व काही बंद पडले आहे. 

     मैदाने क्रीडांगणे चित्रपट ग्रह, नाट्यग्रह, उपहारगृहे ,खानावळी, शॉपिंग सेंटर ,मॉल्स बंद तसेच देशातील सर्वच मंदिरे, चर्च ,मज्जिद, गुरुद्वारे, सर्व काही भक्तांच्या दर्शनासाठी बंद झाले.कोणाच्याही स्वप्नात, मनात,, कधी असे होणार आहे हे आले नसेल पण ते झाले ..!! हे निसर्ग म्हणा किंवा मानव निर्मित म्हणा किंवा कशानेही म्हणा पण हे एका शक्तींनी दाखवून दिले की या विश्व सृष्टीवर मानव किती बुद्धीजीवी असला, विज्ञान कितीही पुढे गेले असले ,त्याने सर्वकाही निर्माण केले असलेतरी, मानवाच्या सर्व काही हातात असले तरी मात्र एक रिमोट कंट्रोल शेवटचा माझ्या हाती आहे, एका अज्ञात शक्तीने हे दाखवून दिले आहे व ही अज्ञात शक्ती म्हणजेच कुणी तिला देव म्हणतो ,कुणी तिला ईश्वर म्हणतो, कुणी तिला रब म्हणतो,कोणी तिला अल्ला म्हणतो ,कोणी येशू म्हणतो,  या विश्वसृष्टीत  सर्वात मोठी आहे ती ही शक्ती  व तीला सर्वांनीच आता मान्य केले आहे व करावीच लागणार आहे.





       या लॉकडाऊनमधून  मंदिरही सुटले नाहीत. सर्व मंदिर ,मज्जित चर्च बंद झाले.शिर्डीत असणारे श्री साईबाबांचे मंदिरही 17 मार्च 2020 दुपारी तीन वाजेपासून साईभक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले.श्री साई संस्थानने आपले निवासस्थाने व प्रसादलय बंद केलीत. देशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिर, श्री वैष्णोदेवी माता मंदिर, अमृतसरचे सुवर्णमंदिर ,मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, देशातील सर्व प्रसिद्ध ,आणि छोटे-मोठे सर्व गावागावातील मंदिरेही दर्शनासाठी बंद झाली ,चर्चे बंद झाली ,मज्जिद सर्व काही बंद झाले.
       
       25 मार्चला देशभर लॉकडाऊन सुरु झाला आणि मग काय सर्वच बस, रेल्वे, विमाने, खाजगी वाहने, येणे  जाणे बंद झाले. जिल्ह्यातील सर्व मंदिरे मस्जिद,चर्च सर्व काही बंद झाले, दररोज फुलांचा भरणारा बाजारही बंद आहे. जिकडेतिकडे दिसणारे मोठे गुलाबाचे पुष्पहार व वेगवेगळ्या फुलांचा सुगंध ही दिसेनासा झाला आहे. आठवडे बाजार बंद ,कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद, त्यामुळे शेतातील कामेही बंद, शाळा बंद, महाविद्यालय बंद, परीक्षाही रद्द, त्यामुळे मुलांचा अभ्यासही बंद अशी हि परिस्थिती लॉकडाऊन ने केली  जिल्हा वासियांची. पण काय करणार..."आलिया भोगासी" ही म्हण सर्व परिचित आहे, पण या लॉकडाऊन नी ती आचरणात प्रत्येकालाचआणावी लागली आहे  हे सत्य आहे.
         
      श्री साईमुळे अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झालेल्या व अहमदनगर जिल्ह्यातच असणाऱ्या  शिरडीत महामारी प्लेगची साथ आली होती, मात्र त्यावेळी एवढे वातावरण झाले नाही, कारण तीचा बंदोबस्त श्री साईंनी वेशीवर पीठ टाकून केला होता, त्यावेळेस श्री साईंनी लक्ष्मणरेषा आखली होती, जणू तीच लक्ष्मणरेषा, तोच संदेश आज या लॉक डाऊनकाळात घराबाहेर न पडण्यासाठी कामात येत आहे.

     या कोरोना महामारी मुळे ह्या माझ्या अहमदनगरीतील भूमीत अशी ही श्रीरामनवमी, चैत्र नवरात्र गुढीपाडवा, बैसाखी ,सर्व सण उत्सव पहिल्यादाच अगदी शांत गेले.अशा या शांत ,शांत परिस्थितीत सर्वांनाच आता खरं उबग आली आहे कारण येथे सर्व काही बंद आहे, सर्व रस्ते ओस पडले आहेत, अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडून सर्व काही बंद आहे.प्रत्येकजण आपापल्या घरात आहे, शाळा, महाविद्यालये, खासगी ट्रॅव्हल्स ,व्यावसायिक नोकरदार, यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. सर्वत्र सुने, सुने वातावरण आहे अशा या सुन्या सुन्या ,शांत ,शांत वातावरणाचा प्रत्येकाला या पंधरा वीस दिवसात अनुभव आला आहे. पण दररोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनापेक्षा जे काही दिवस का होईना उपभोगायला मिळालेले शांततेचे दिवस सुद्धा मनाला जीवाला शरीराला समाधान देणारे ठरत आहे.   
           
     त्यामुळेच प्रत्येक जण हळूहळू या लॉकडाऊन काळात शांततेत जीवन जगण्याचा आता आनंद घेत आहेत.नेहमी गजबजलेल्या वातावरणापेक्षा हे शांत शांत वातावरण प्रत्येकालाही जरा हळूहळू बरे वाटायला लागले आहे.नेहमी गजबजलेली जिल्ह्यातील शहरे, गावे आणि आत्ताची शांत, सुनि सुनि वाटणारे शहरे ,गावे ,खेडे  यात मोठा फरक जाणवत आहे, पहाटेच उठून प्रत्येक माणूस व त्याचे जीवन हे सुरू होऊन दिवसभर धावपळ दिसायची, प्रत्येक जण सकाळी पहाटे उठल्यापासून संध्याकाळी रात्री उशिरा झोपेपर्यंत आपल्या कामात दंग, कोणी दुकान उघडतो, कोणी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यास नाक्यावर तत्पर असतो ,कोणी फुले  विकतो, कुणी पॉलिसी चे काम करतो, कुणी आपल्या बुटांना पॉलिश करून घेतो, कोणी दुकानात धंदा करतो, कुणी बाजारात जातो, कोणी भाजीपाला विकतो ,कुणी दर्शनासाठी गडबड करतो, कुणी भक्तांना  सुविधा देण्यासाठी धावपळ करतो, तर कोणी नोकरीवर जाण्यासाठी, कुणी अधिक पैसे कसे कमवता येईल यासाठी रात्रंदिवस प्लॅन आखत असतो.मुले ,विद्यार्थी, शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी, कुणी बस पकडण्यासाठी, कोणी रेल्वे ,विमान, पकडण्यासाठी मोठी धावपळ करताना नेहमी  दिसत होते. मात्र गेल्या काही दिवसापासून कोणाचीही धावपळ दिसत नाही कि गडबड,माझ्या भूमीत असणारे ,अनेक बसेस व प्रवाशांनी नि गजबजलेले बसस्टॅन्ड आता सुनेसुने आहे, कधीही सामसूम न दिसणारे  बस स्थानके ,मात्र अगदी सुनेसुने दिसत आहे ,  रेल्वेही येत नाही,जात नाही, रेल्वे स्थानक, रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वेची वाट बघणारे रिक्षा चालक व त्यांच्या रिक्षांचा घोळका आता शांत झाला आहे.विमानेही  बंद झाल्याने  विमानतळ शांत झाले आहे.शिर्डी विमानतळा बाहेर प्रवाशांना ने आण करणाऱ्या कारही आता आपल्या घराच्या अंगणात उभ्या आहेत, शहराशहरात, गावागावात, खेड्यापाड्यात ,वाड्या-वस्त्यांवर सर्वकाही शांत आहे.

       नेहमी  गजबजलेली शहरे, गावे ,एकदमच शांत झाली आहे. त्यामुळे एक प्रकारे हा एक वेगळाच अनुभव पहिल्यांदाच या लॉकडाऊन मुळे पाहायला मिळत आहे. शहरात, गावात राहणारे प्रत्येक कुटुंब ,प्रत्येक, व्यक्ती ,घराघरात आहे. कुणी टीव्ही पाहतो, कुणी आपल्या परिवाराबरोबर रमत-गमत खेळतो, कोणी प्राणायाम, योगासनं करतो आहे, कोणी  श्री साईसतचरित्र ग्रंथ, कुणी भागवत, कोणी महाभारत वाचत आहे,कोणी श्री साई स्तवन मंजिरी , कोणी श्री हनुमान चालीसा वाचत आहे,  कुणी ऐतिहासिक, कुणी कादंबऱ्या , पुस्तके, ग्रंथ ,कथासंग्रह  वाचून  आपला वेळ घालवत आहे, कुणी टीव्हीवर परत लागलेले रामायण-महाभारत पाहत आहे, वेळेचा सदुपयोग होत आहे ,कधी इतका वेळ मिळाला नाही व कधी वेळ मिळाला असताच थोडाफार, तरी कोणी  कधी असे केले नसते,  मात्र या लॉकडाऊनने सर्वांना  वाचन ,पूजन , लेखन , शिस्त,  शांतता  सर्वकाही  शिकवले आहे.      
              
     असा हा वेळ प्रत्येक जण घरात कुटुंबाबरोबर घालवतो आहे.कोणाला धावपळ ,गडबड , टेन्शन नाही,सर्व काही शांत शांत, ना कोणाची देणेदारी ,ना कोणाची घेणेदारी, सर्वजण आपल्या घरात आहे व आहे त्यावरच समाधान मानत आहे, मग तो गरीब असो वा श्रीमंत असो, लहान असो मोठा असो ,महिला असो वा पुरुष असो, सर्वजण सारखे झाले आहेत, कोणाचा अहंभाव दुखणे नाही किंवा कोणाचा मानापमान होत नाही ,शिवीगाळ, मारामाऱ्या पाकीटमारी ,मोटर सायकल चोरी, चेंज स्नेकिंग ,लुटालुट ,सर्व काही थांबले आहे, पोलीस स्टेशन सुद्धा मारामाऱ्या,भांडणे अशा अनेक फिर्यादी मुळे नेहमी गजबजलेले,मात्र आता तेही नाही. फिर्यादी यांची गर्दी नाही , न्यायालय सुद्धा शांत शांत, अवैध दारूधंदे ,मटका जुगार अवैध वाहतूक, सर्व अवैध व्यवसाय प्रयत्न करूनही बंद न होणारे असे अनेक अवैध व्यवसाय या लॉक डाऊन मुळे काही न करता बंद पडले आहेत, अनेकदा वाहनांची शिस्त, ट्राफिक जाम समस्या सुटता सुटल्या जात नव्हत्या परंतु ह्या।लॉकडाऊन मुळे  न ट्राफिक जाम, न कोठेही पार्किंग,ना अपघात, आता सर्वकाही सुरळीत आहे.
       
       या लॉकडाऊनमुळे आई ,वडील ,भाऊ-बहीण ,मुले सर्व आपापल्या घरात एकत्रित नांदत आहेत.शहरात  गावात राहणाऱ्या प्रत्येक घरात आता एकत्रित आनंद , समाधान शांतता, निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ना रस्त्यावर हॉर्नचा कर्कश आवाजाचा त्रास,ना अपघात ,ना प्रदूषण सर्व काही स्वच्छ , सुदंर वातावरण वाटत आहे, दररोज कितीही साफ केले तरी कचरा होणारे रस्ते आता मात्र दररोज साफसफाई न करताही स्वच्छ दिसत आहेत.  रस्त्यावर गुटखा खाऊन लाल रांगोळ्या काढणारे आता दिसत नाहीत, त्यामुळे रस्तेही ही अशा रांगोळ्याविना झाले आहेत, स्वच्छ, सुंदर शहरे आता खरी स्वच्छ सुंदर वाटू लागली आहेत.येथे सर्वत्र चौकाचौकात गप्पा मारत थाबणारे,आडव्या-तिडव्या मोटरसायकल चालवणारे ,इकडून तिकडे फिरणारे दिसत नाहीत.प्रत्येक जण आता आपल्या घरात लॉकडाऊनच्या नियमामुळे जणू घरात बंद आहे.आता प्रत्येक जण आपल्या मित्रांबरोबर, नातेवाईकाबरोबर भ्रमणध्वनीद्वारे एकमेकांची आपुलकीने विचारपूस करत आहे.लॉकडाऊन मुळे  एकमेकांवरील प्रेम वाढले आहे. प्रत्येक जण आपल्या भ्रमणध्वनीद्वारे प्रत्येक जवळच्याची चौकशी करत आहे. प्रत्येकाला या  संकटातून मुक्त होण्यासाठी, मुकाबला करण्यासाठी शक्ती देण्याची विनंती आपापल्या देव, ईश्वर, अल्ला, येशू यांच्याकडे करीत आहे.

         आज पर्यंत कधी असा लॉकडाऊन  पाहिला नाही.या लॉकडाऊन मध्ये आलेले गुढीपाडवा, रामनवमी,गुडफायडे, शब्बे ए  बारात अशा विविध धर्माचे सण साजरे झाले नाहीत झाले तरी ते घरातच झाले.हनुमान जयंती, महात्मा ज्योतिराव फुले जयंती असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो ती ही गाजत वाजत विविध कार्यक्रमाने साजरी कोठेही करण्यात आली नाहीत. त्यामुळे न वर्गणी ना डीजे ना मिरवणूक सर्वकाही शांततेत व आपल्या घरात या राष्ट्र पुरुषांना महामानवाला पुष्पहार घालून घरातल्या घरात अभिवादन करून हे पुण्यतिथ्या घरा-घरात साजरा झाल्या. ना खर्च ना ध्वनि प्रदूषण जो तो आपापल्या परीने गरजूंना मदत करताना पाहून  मोठा आनंद होत आहे.    

       स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा लॉक डाऊन या दिवसात पहायला मिळाला. अनेकांनी  या लोक डाऊन काळात आदी लग्न पत्रिका छापूनही  व मंगल कार्यालय  सर्व काही नियोजित असूनही हा डाम ढौल रद्द करत अगदी साध्या पद्धतीने कोणालाही आहेराचे त्रास न देता व नघेता लग्न लावली.  कोणीचीही लग्नाला गर्दी नाही,कोणाचे राजकीय कार्यक्रम नाही, कोणाची घरभरणी नाही  कोणाचे जागरण गोंधळ,कोणाची कंदुरी नाही, कोणाच्या यात्रा नाही  कोणाचे सांस्कृतिक कार्यक्रम नाही, सर्वकाही शांततेत हे पाहून ऐकून  प्रत्येकालाच मनात  समाधान  वाटत असेल  कारण  या गोष्टीत विनाकारण जाणारा वेळ  पैसा व धावपळ ही वाचले आहे.

          जिल्ह्यात व जिल्ह्यातील विविध शहरात,गावात, जिल्हा व स्थानिक पोलिसांनी कितीही वेळा दारू बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु अवैध दारूधंदे ,मटका, दारू जुगार ,चालूच..!! परंतु या लॉक डाऊन मुळे काही न करता ते आपोआप बंद पडण्याच्या स्थितीत आहे वा पडले आहेत. कोणतीही गोष्ट प्रयत्न करूनही जी होत नाही ती या लॉकडाऊनने  सिद्ध करून दाखवली आहे.त्यामुळे एका दृष्टीने प्रथम सर्वजण जरी चिंतेत आहे ,लोकांना आर्थिक विवचंनेमुळे आर्थिक प्रगती स्तब्ध झाल्यामुळे नाराजी होती,शेतकऱ्यांचा माल बाहेर विकला जात नव्हता त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत होते,  मात्र  केंद्र राज्य सरकारने विविध योजना राबवत मजूर महिला  शेतकरी  यांना मदत केली वा करत आहेत.

        देशात उद्योगधंदे व्यवसाय सर्व काही बंद आहे सरकारकडे येणारा कररूपी पैसाही बंद झाला आहे,शिवाय विविध योजनाही अमलात आणल्या जात आहेत. अशा संकटमय आपत्तीजनक परिस्थितीत मोठा खर्च होत आहे. त्यामुळे देशवासीय आर्थिक संकटात येत आहे मात्र देशवासीयांचे कल्याण हेच महत्त्वाचे आहे व त्यासाठी सर्व धडपड करीत आहेत.
     
     डॉक्टर,नर्स,आरोग्यसेविका, पोलीस जो तो आपल्या परीने या संकटात योग्यपध्दतीने मदत करीत आहेत. देशही या संकटातून आर्थिक परिस्थितीतून सर्वांच्या शक्तीने हिमतीने परत बाहेर निघून विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणार आहे.ठेच लागली तरच माणूस पुढे खड्डा बघून चालतो आता प्रत्येकाला कोरोनाने हेच तर दाखवून दिले आहे.

       सर्व जग या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी धडपड करीत आहे व लवकरच बाहेर पडेल अशी आशा आहे, व त्यासाठी एकमेव असा लॉक डाऊन हा पर्याय आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे, या लॉकडाउन मुळे देशहिता बरोबरच वैयक्तिकहि, ग्राउंड लेव्हलवर काही महत्त्वाचे बदल जाणवत आहेत. देशात, राज्यात, जिल्ह्यात या लॉक डाऊन मुळे शांतता, शांतता निर्माण झाली आहे,एका दृष्टीने या लॉकडाऊन मुळे अनेक गोष्टी चांगल्याही घडल्या आहेत, ना कोणाची देणेदारी ना घेणेदारी, शासनानेही घरबसल्या रेशन मार्फत अन्नधान्याची सोय केलेली, त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीबनाही ना भोजनाची चिंता,ना कामाची चिंता,
खाजगी वाहनांना पेट्रोल बंद, डिझेल बंद सर्वत्र संचारबंदी जारी, त्यामुळे रस्ते ओस पडली आहेत.रस्ते व त्यामुळे प्रदूषण कमी झाले आहे, सकाळी उठल्याबरोबर वाहनांच्या हाॅर्न एेवजी आता पक्ष्यांची किलबिल ऐकू येत आहे.नेहमीच्या या धावपळीमध्ये प्रत्येक ठिकाणी मग दवाखाना असो,बस रेल्वेचे, तिकीट काढणे असो, दर्शनासाठी रांगेत असो,कुठेही असो आपला नंबर लवकर कसा लागेल अशा पद्धतीने वशिला लावणे व कसा नंबर लावून आपण पराक्रम करू अशी प्रत्येक ठिकाणी असलेली धावपळ ,चढाओढ ,स्पर्धा, वशिलेबाजी या लॉकडाऊनमुळे कुठेही दिसून येत नाही.
प्रत्येक कुटुंबातील सदस्य जो नोकरीनिमित्त दुकानात किंवा कारखान्यात, ऑफिस मध्ये कोठेही आपला काम, धंदा करण्यासाठी जीवाची परवा न करता धावपळ करीत होता,घरी न जेवता बाहेर नाश्ता चहा ,जेवण करुन रात्री च झोपायला येत होता, अश्या धावपळ करणाऱ्यांनाही आता यामुळे घरचा चहा ,घरचे नाष्टा, घरचे जेवण घेऊन तृप्तीचे ढेकर मिळत आहे.अशा या लॉक डाऊनचे फायदे   जिल्हयात राहणाऱ्यांमध्ये दिसत आहे, सर्वत्र बंद असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरातच कोणी दर्शन करत आहे, कोणी नमाज पडत आहे ,कोणी येशूला प्रार्थना करत आहे ,घर एक मंदिर झाले आहे, मज्जिद, चर्चे झाले आहे, हे पाहून  मोठे समाधान वाटत आहे,आता येथे कुणी दारुडे रस्त्याला दिसत नाही ,भांडणे ऐकू येत नाही ,इतर साथीच्या आजाराने गजबजलेले दवाखाने आता शांत वाटत आहे, कुठेही ना मारामारी,ना वादावादी ,रस्त्याला अपघात होत नाहीत, शहरात गावात याचना  करणारे भिकारी दिसत नाही ,फेरीवाले दिसत नाहीत दरवर्षी गल्लोगल्ली गावोगावी फिरणारे कुल्फी वाले भैय्या दिसत नाही की गर्दीने फुलले रसवंतीगृह दिसून येत नाही.

     या कोरोनाच्या  मुकाबल्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शहरे गावे खेडे, सर्व रस्ते,गल्ल्या, चौक, सार्वजनिक ठिकाणे, सर्वत्रच  सेनेटायझेशन झाले आहे. सर्वत्र  जंतुनाशक फवारणीने स्वच्छ झाले आहे. आता कशाची चिंता नाही, सर्व काही शांत सुरू आहे ,लॉक डाऊन मुळे  प्रथम मोठी चिंता वाटली होती, गजबजलेली ही शहरे गावे,,दररोज लाखो रुपयांची उलाढाल, हजारो येणारे जाणारे, अनेक कार्यक्रम पण सर्व शांत शांत. यात अहमदनगर जिल्ह्यात  देशात तिरुपती नंतर सर्वात श्रीमंत असणारे व प्रसिद्ध श्री साई मंदिर हे साई भक्तांना दर्शनासाठी काही दिवसासाठी बंद होणार.जिल्ह्यातील सर्व मंदिरे मस्जिद,चर्च तसेच बस ,रेल्वे, विमाने येणार नाहीत त्यामुळे कुठे जाने नाही येणे नाही, या जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांचे कसे होणार..? हे ऐकूनच  पहिल्यांदा थक्क झाले होते, मात्र या लॉकडाऊन काळात काही गोष्टी अडचणीचे ठरले असतीलही, मात्र यामुळे मोठा फायदाही झाल्याचेही दिसत आहे, आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे 28 रुग्ण आजपर्यंत आढळले आहेत.अहमदनगर, आलमगीर जामखेड, नेवासा, संगमनेर, कोपरगाव आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले मात्र वेळीच दौंड केल्यामुळे कोरोना चा संसर्ग या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरला नाही. श्लोक गाईल्या मुळे पुना मुंबईपेक्षा जिल्ह्यात विशेष करून लगाम बसल्याचे दिसून येते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या , लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.भौतिक समाधाना पेक्षा आत्मिक समाधान खूप महत्त्वाचे आहे व ह्या लॉकडाऊन मुळे ते दाखवून दिले आहे. मानवाने सर्व निर्माण केले आहे ,मात्र निसर्ग त्याच्याही पुढे आहे.या जगात,या विश्वात एक शक्ती अशी आहे हे की तीच सर्व संचालन करत असते, तिलाच आपण देव, कोणी ईश्वर, अल्ला, बौद्ध अशा आपआपल्या प्रमाणे म्हणतात.आज कोरोना मुळे सर्व जगाला ट्वेंटी टेटस ची गरज पडत आहे ते थेटर प्रत्येकाला शरीरात ऑक्सिजन मुबलक मिळावा म्हणून त्याचा उपयोग होतो. आज निसर्ग शक्तीने आपणास मुक्त ऑक्सिजन भरपूर दिला आहे मात्र ते मोफत असल्यामुळे त्याचे महत्व नही.मात्र अतिदक्षता जो रुग्ण आहे त्याला मात्र या ऑक्सीजन चे महत्व कळून येत आहे. जगात अनेक महासत्ता देश आहेत.अनेकांनी रणगाडे, तोफा मिसाईल बनवून अनुभवाची तयारीही केली आहे. युद्धासाठी लाखो सशस्त्र सैनिक तैनात आहेत मात्र एक डोळ्याला न दिसणारा विषाणू या मिसाईल, तोफा, रणगाडे किंवा बंदुकीच्या गोळ्यांनी न मरणारा आहे सर्व जगाला मात्र या विषाणूने हतबल करून सोडले आहे. मोठमोठे मिसाईल असूनही या देशांना त्याचा काहीही उपयोग नाही. अनेक देशांनी भारताकडे क्लोरोक्वीन जनरिक गोळी मोठ्याप्रमाणात मागितली आहे हे भारताचे मोठे यश आहे.   
    
      भारतानेही माणुसकी मधून या गोळ्यांचा पुरवठा इतर देशांना करण्याचे ठरवले आहे हेच भारताचे खरे योगदान आहे. हीच भारताची खरी संस्कृती आहे. अनेक मक्हान साधुसंतांचा हा देश आहे. येथे विविध राज्य,विविध भाषा, विविध वेशभूषा, विविध संस्कृती, सण उत्सव, खाणे पिणे वेगवेगळे आहे. परंतू भारत देशाच्या तिरंगा खाली सर्वजण एक आहेत हेच भारताचे खरे जगापेक्षा मोठे श्रेष्ठत्व आहे. त्यामुळेच भारत आता जगातल्या सर्व देशांमध्ये कोरोना वर मात करण्यासाठी अग्रेसर ठरला जात आहे. सर्व देशांनी भारताची प्रशंसाही केली आहे. वेळेत लाॅकडाऊन केल्यामुळेच  ही गोष्ट घडली आहे. म्हणून लॉकडाऊन जरी नकळत सर्वांना अडचणीचा ठरला गेला असेल तरी मात्र तो कोरोना पासून वाचवण्यासाठी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी परिवाराची सुरक्षा करण्यासाठी आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची ,जिल्ह्याची, राज्याची देशाची सुरक्षा जपण्यासाठी, महत्त्वाचा आहे.हाच खरा मोठा विषय आहे.आपला या लॉक डाऊनमुळे फायदा आहे जगात व देशात  अनेक जाती धर्म आहेत  व या सर्व जाती धर्माचे, सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान श्री साईबाबा आहेत व श्री साईबाबांची पावनभूमी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आहे येथूनच श्री साईबाबांनी सर्वधर्म समभावाचा संदेश संपूर्ण  विश्वाला दिला आहे, म्हणूनच श्रद्धा ठेवून सबुरी, शांतता धरली पाहिजे ,घराघरात राहून शांत जीवन जगून ती आचरणात आणली पाहिजे हा प्रत्येकाच्या जीवनात प्रथम आलेला लॉकडाऊन निसर्गाची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही, व या विश्वात ,या जगात कितीही विज्ञानाने पुढे गेले ,किती भौतिक सुख मिळाले ,कितीही मिसाईल, रणगाडे तयार केले, तरी ती कमी आहे, या शक्तीची ,या निसर्गाची ताकद फार मोठी आहे, तिला प्रत्येकाने यापुढे तरी झिडकारून चालणार नाही, निसर्गाला व सर्वात मोठी शक्ती असणाऱ्या निसर्ग देवतेला आपण नतमस्तक झालेच पाहिजे व हे़ या लॉकडाऊनने सर्व जगाला दाखवून दिले आहे, मग अमेरिका असो ,जपान ,इटली ,रूस असो किंवा बांगलादेश ,पाकिस्तान, नेपाळ असो ,जगातील सर्व देशांना, डोळ्यांना न दिसणाऱ्या या कोरोना विषाणू च्या प्रसारामुळे, संसर्गामुळे हैराण करून सोडले, मोठमोठे श्रीमंत, बलाढ्य देश सुद्धा हतबल झाले आहेत ,अशा परिस्थितीत, धावपळीच्या युगात, शांतता व सबुरी महत्वाची आहे व हाच श्री साईबाबांनी श्रद्धा सबुरी चा संदेश देऊन जगाला मोठी शिकवण दिली आहे, व हीच शिकवण यापुढे प्रत्येकाच्या जीवनात कामाला येणार आहे, असे साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या  या भूमीने अनुभवलेल्या आजपर्यंतच्या इतिहासातील विविध प्रसंगातून, संकटातून तरी दिसून येत आहे, व श्री साईच यातून सर्वांना निभावून नेतील याची खात्री आहे,पण त्यासाठी श्री साईंचा सबुरी चा संदेश प्रत्येकाने आचरणात आणून अजून तीन मे पर्यंत असे का होईना हे काही दिवस तरी आपल्या घरातच राहणे   महत्त्वाचे ठरणार आहे व आहे त्या परिस्थितीत समाधान आनंद मानत "जान है तो जहान है । नही तो सब बरबाद है। " हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
close