" ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो "
माणसाला माणसं जोडायची असतील तर प्रेमाने जोडता येतील आणि जोडलेली माणसं एकदा का जवळ आली की,ती सहसा दूर होत नाही.कारण प्रेमामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे की त्यातून एकमेकांना दूर करणे अवघड आहे. एखाद्यावेळी दोघांच्यापैकी एकाच्या मनात कुणीतरी तिरस्काराचे विष पेरले असेल तर दुरावा निर्माण होण्यास काही वेळ लागणार नाही.याला जबाबदार दोघांपैकी एक जणच असतो. त्याचेही कारण असे आहे की, दुसऱ्याच्या ऐकण्यावरुन आपल्या हलक्या आणि नाजुक मनावर आघात होतो त्यामुळे समोरच्या माणसाच्या माणसाने अंत:करणातून केलेल्या प्रेमाचा विचारच करत नाही. लगेच अनेक दिवसांपासून असलेले नाते एका क्षणात कसलाही विचार न करता तोडायला तयार होतो आणि अनेक काळापासूनचे असलेले प्रेमाचे नाते तोडायला कारणीभूत होतो.त्यामुळे पुन्हा जोडण्यासाठी त्यातील एकजण पाण्यातल्या मासळीसारखा नेहमी तडफडत असतो.
"मन लवकर तोडता येते हो पण लवकर जोडता येत नाही."
ह्या जगात प्रेम,आपुलकी,मैत्री जर टिकवायची असेल तर पहिल्यांदा आपल्या मनात नेहमीसाठी इतरांविषयी आपुलकीची सदैव भावना निष्पृहतेने असायला हवी.कुणी कितीही कुणाबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या मनाने कधीच ते स्वीकारायला नाहीच पाहिजे.जरी असे घडले तरी त्यात दुरुस्ती कशी करायची आणि ते पुर्ववत कसे करायचे याचाच आधी विचार करावा. कारण हे जीवन फार छोटे आहे,आपण आपल्या जीवनात राम-लक्ष्मण-भरत आणि कृष्ण-सुदामा यांची मैत्री व प्रेम यांचे उदाहरण आपल्या आयुष्यात नेहमी ठेवाले तर कदाचित जीवन सुंदरच असेल आणि हा व्यत्यय येणारच नाही.
" ज्योतसे ज्योत जगाते चलो l
प्रेम की गंगा बहाते चलो।।
याप्रमाणे नाते जोडायला आणि जुळायला शिकले पाहिजे तरच जीवन आनंदाने जगता येईल,आयुष्यभर त्याचा फायदा होईल.जर तिरस्काराने जगले तर मग जीवन जगणे असह्य होऊन जाईल किंवा होतेच..!!
आपल्यातील एखादा चुकतही असतो,परंतू आपले विचार जर चांगले असतील तर परमेश्वर नक्कीच त्याला वठणीवर आणतो पण त्या अगोरच कधीही प्रेम तोडू नये.यातच खरा मोठेपणा,शहाणपणा आहे,अन्यथा जीवन व्यर्थच आहे.त्यामुळे दोघांच्याही मनाला त्रास किंवा मनस्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
"विचार आणि आनंदाने जगायला शिका".
"तुम्ही जगा,दुसर्यांना जगवा आणि जीवनातला आनंद द्विणुणीत करा".
आपण सर्व मित्र,बंधु-भगिनी अतिशय चांगल्या विचाराचे आहोत,कुणाचे आजपर्यंत कधी भांडण नाही की भेदभाव नाही याबद्दल माझ्या बंधु-भगिनी मित्रांना,सहकार्यांना मानाचा मुजरा. आपले वितुष्ट कधीही येऊ नये हीच,साईचरणी सदैव प्रार्थना.
"जय साईराम"
🌹🌹🌹धन्यवाद🌹🌹🌹

आपलाच विश्वासू,
रमेश जेठे सर( नगर)
संपादक - "शिर्डी एक्सप्रेस"
मो.9960854765/8796121201
"घरीच रहा,आरोग्य,जपा,
सुरक्षित रहा,कोरोना लवकर पळवा"
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝