देवळाली प्रवरा -
देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथे सुरू असलेल्या घरपोहच अन्नदान सेवेची पाहणी करण्यासाठी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. लहुजी कानडे साहेब यांनी भेट देऊन या अन्नदान सेवेबद्दल कौतुक करून समाधान व्यक्त केले व शासनाच्या वतीने या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आस्वासन दिले. या प्रसंगी चैतन्य उद्योग समूहाचे अधक्ष्य गणेश दादा भांड, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, साई आदर्श मल्टिस्टेट चे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आर. पी. आय. चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, शिवसेना शहर प्रमुख विजय गव्हाणे, पत्रकार श्रीकांत जाधव, स्वप्नील कुंभार, निलेश कुंभार, प्रतीक जाधव, सागर भालेराव, शिव व्याख्येते हसन सय्यद, जयेश सुडके, ऋषी राऊत, अमोल पाटोळे, आदेश तारडे, बंटी सेकडे आदी उपस्थित होते.


