shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत लाॅकडाऊन काळात लाखो रुपयांचा बियर साठा जप्त.



सावळी विहिर : राजेंद्र गडकरी
            कोरोना मुळे  देशभर लॉकडाऊन सुरू आहे,अशा  परिस्थितीत अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, दारू दुकाने व परमिटरूम, बियरबार सुद्धा बंद आहेत, मात्र काही बियरबार वाल्यांनी मोठा विनापरवाना अवैध साठा करून ठेवला असून ते दामदुपटीने विक्री करत आहेत ,अशा बिअरशॉपी, वाईन्स, परमिटरूम यांच्यावर जिल्हा दारूबंदी व  उत्पादक शुल्क अधिकारी व पोलिसांनी अधिक कडक पहारा सुरु केला आहे, यातूनच जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क पोलिसांनी गुप्त माहिती मिळताच निमगाव कोऱ्हाळे हद्दीतील आनंद बिअर शॉपी वर धाड टाकली व या शॉपी पाठीमागील बाजूस असलेल्या पत्र्याच्याशेड गोडाऊन मधून  लाखो रुपये किमतीचे बियरचे बॉक्स  होते,  ते जप्त करण्यात आले, यामुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे,
   
        देशासह राज्यात कोरोना चा मुकाबला करण्यासाठी लॉक डाऊन सुरू आहे ,त्यामुळे सर्व दारूधंदे बंद आहेत  ,अशा परिस्थितीत  काहीजण  अवैद्य दारू साठा करून  दाम दुप्पट रक्कम घेऊन  दारू विक्री करत आहेत या गोष्टीची माहिती मिळताच  जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क अधिकारी व पोलिस कर्मचारी शिर्डीत येऊन या बियर शॉपी च्या गोडाऊन मध्ये धाड टाकून अवैध साठा केलेली हि दारू जप्त केली,



           
        सध्या या लॉकडाऊन काळात दारू दुकाने बंद आहेत, दारू विक्री करणे, यास परवानगी नाही, मात्र काही बिअरबार वाल्यांनी, वाईन्स दुकानवाल्यानी,  जवळच्या गोडाउन मध्ये अवैध साठा करून बिअर, दारू या काळात दुप्पट ,तिप्पट रक्कम घेऊन विक्री केली जाते, हे जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क पोलिसांना समजल्यानंतर या पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयित अशा ठिकाणी धाडी टाकल्या, त्यात या आनंद बिअर शॉपी वर धाड टाकली असता या बिअर शॉपी च्या पाठीमागील बाजूस  पत्र्याच्या शेड गोडाउन मध्ये असलेल्या  24 लाख 39 हजार 72 रुपये किमतीचे किंगफिशर, कॅनोन, वडवायझर अशा विविध कंपन्यांच्या बियर व विविध कंपनीचे वाईन्स च्या छोट्या, मोठ्या।अश्या एकूण 964 बाटल्यांच्या बॉक्सचा  साठा करून ठेवलेला होता , तो या गोडावूनमधून जप्त करण्यात आला व एका ट्रकमध्ये भरून तो नगर कडे रवाना करण्यात आला, या गोडाऊन चे मालक व बिअर शॉपी चे  मालक योगेश नंदकुमार कडलक  यांच्यावर  गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
      
        मा.राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी ,अहमदनगर  व राज्य दारूबंदी उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त प्रसादजी सुर्वे तसेच या खात्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पराग नवलकर, कोपरगाव चे निरीक्षक घोरतळे ,निरीक्षक संजय सराफ अनिल पाटील, अजित बडदे भाऊसाहेब भोर ,निहाल शेख, राजेंद्र कदम ,विलास कंठाळे प्रवीण साळवे, पांडुरंग गदादे, आदींच्या पोलीस अधिकारी व पोलिसांच्या साह्याने या बिअर शॉपी वर धाड टाकण्यात आली व कारवाई करण्यात आली. या सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे शिर्डी परिसरातून अभिनंदन होत आहे, जिल्ह्यात ही मोठी कारवाई समजली जाते.मात्र या बिअर शॉपी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शिर्डी पोलीस स्टेशनला मात्र याची काहीच माहित नव्हती, याबद्दल नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे, लॉकडाऊन देशात सुरू झाल्यापासून सर्व दारूधंदे बिअर शॉपी बंद आहेत, मात्र तरीही ही अनेक ठिकाणी रानात ,आडबाजूला काही लोक दारू ,बिअर घेऊन पार्टी करताना दिसतात, जर सर्वत्र दारूधंदे बिअर शॉपी, वाईन्स बंद आहेत, मग हे दारु, बियर या लोकांना कुठून मिळते हा प्रश्न मोठा असून अशा परवानगी नसतानाही साठा करून ठेवलेल्या बियर व विविध प्रकारच्या दारू च्या बाटल्या हे दारू विक्रेते, मालक दुप्पट ,तिप्पट रक्कम घेऊन लोकांना गुपचूपपणे विकतात. असा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हा प्रकार सध्या गुपचुपपणे सुरू असून त्यावर जिल्हाधिकारी व जिल्हा  पोलीस अधीक्षक यांनी विशेष लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिक बोलत आहेत.
   
       लॉकडाऊन काळात लोकांना ताज्या भाज्या अनेक अत्यावश्यक गोष्टी मिळत नाही, तरी सर्व सामान्य माणूस कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊन चे नियम पाळत घरात आहेत ,मात्र काही लोक या लॉकडाऊन चा नियम तोडून दारू, बियर गुपचुप दाम दुप्पट पैसा कमवण्यासाठी विक्री करत आहेत व काही लोक हे बिअर किंवा दारू दाम दुप्पटरक्कम देऊन आडबाजूला किंवा निवांत स्थळी ,आड बाजूला जाऊन पार्टी करतात  हे चुकीचे असून यावर आता अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

 जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क पोलिसांनी अधिकाऱ्यांनी जिल्ह्याभर अशी मोहीम सुरू केली आहे त्यामुळे जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
close