उदगीर | प्रतिनिधी |
भारतात कोरोना महामारीच्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर अनेक गरिब कामगार व मजुरांचे अन्नावाचून खुप हाल होत आहेत या परिस्थितीचे गाभीर्य लक्षात घेऊन मा. जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत पटेल फजल मु.अ. इंदिरा गांधी निवासी अपंग विद्यालय,औराद शाह,ता.निलंगा यांचेवतीने लाॅकडाऊन मुळे उदगीर येथील गरजू व्यक्तींचा शोध घेऊन 20 कुटुंबांची निवड केली आणि त्याप्रमाणे त्यांना दैनंदिन जीवनावश्यक अन्नधान्याचे कीट पुरविण्याचे काम हाती घेतले.
या प्रत्येक किटमध्ये
1)गहू किंवा गहूपीठ 5 किलो,
2)तांदूळ 4 किलो,
3)गोड तेल 1 पाकीट,
4)साखर 1 किलो,
5)चहापुडा 1नग ,
6)अंगाचे साबण-2नग,
7)कपड्याचे साबण-4 नग...
याप्रमाणे किट तयार करण्यात आले. या वस्तूंचे वाटप करताना गरजू दिव्यांग व्यक्तींना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. यात जिल्हा दिव्यांग यादी तील सलीम शेख,उदगीर यांना देण्यात आले. त्या बरोबर बेघर निवारा केंद्र, उदगीर येथे काही गोरगरीब मागासवर्गीय, विधवा, रोजंदारी मजूर यांना पण किटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला आपापल्या स्तरावर गरजूंची मदत करण्याचे सूचना दिलेल्या आहेत. आणि पुर्ण वेतनी कर्मचार्याच्या माहे मार्च -2020 वेतनात दोन दिवसाचा पगार 32100/- रुपयांची कोरोना मदत निधी म्हणून कपात केली आहे..विशेष म्हणजे हे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना लाभार्थी व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध उपाययोजनांचे पालन करणे संबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.
अशाप्रकारे दिव्यांग व्यक्तिंचा व गरिब मजूरांचा शोध घेऊन त्यांना मदतीचा हात देत एक वेगळा आदर्श यावेळी उदगीर वासियांच्या मनात जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी निर्माण केला आहे.