- आपत्ती व्यवस्थापन कार्यात ढुस यांचे सहकार्य घेणेसाठी जिल्हाधिकारी यांना सूचना..!
देवळाली प्रवरा:
कोरोना च्या आपत्ती व्यवस्थापन कार्यात देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे सहकार्य घेणे कामी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकरी राहुल द्विवेदी यांना मेल द्वारे सूचना केली आहे.
कोविड19 (कोरोना) च्या पार्श्वभूमीवर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांवर ताण वाढला असून राज्यात कोरोना संक्रमित झालेल्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला मदत करण्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना व व्यक्ती यांची मदत घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रहिवासी असलेले व भारत सरकारचे मान्यताप्राप्त हॅम रेडीओ ऑपरेटर आप्पासाहेब ढुस यांना अत्यंत निकडीच्या वेळी राज्याची संपर्क यंत्रणा बळकट असावी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कामात प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मा. मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सूचनेनुसार व अहमदनगर चे जिल्हाधिकारी मा. राहुल द्विवेदी साहेब यांच्या आदेशानुसार राहुरी चे तहसिलदार फसीओद्दीन शेख साहेब यांनी आज दि. १८ एप्रिल २०२० रोजी ढुस यांना पत्र देऊन कळविले आहे.
आप्पासाहेब ढुस यांनी राज्यात लॉक डाउन जाहीर झाल्यावर राज्यातील बरेच प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून मार्गी लावले. त्यामध्ये राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न, राज्यातील कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्या बाबतचा प्रश्न, तसेच पोलिसांकडून जनतेला विनाकारण होणारी मारहाणी थांबविणे बाबत चा प्रश्न, अत्यावश्यक सेवेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू ठेवण्याबाबतचा प्रश्न, सार्वजनिक ठिकाणी गुटखा किंवा तंबाखू खाणे व थुंकल्यास दखलपात्र गुन्हा ठरविणे बाबत चा प्रश्न, तसेच मुस्लिम समाजातील जनतेच्या विरोधात सोसिएल मेडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून समाजामध्ये द्वेष व तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती च्या विरोधात जनजागृती करून सामाजिक सलोखा टिकविण्यासारखे प्रश्न असतील असे समाजाच्या व राज्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रश्न थेट मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समोर ई मेल द्वारे मांडून या बंद च्या कालावधीत कोणताही गाजावाजा न करता अत्यंत कमी वेळेत जनतेचे प्रश्न सोडविले आहेत.
तसेच लॉक डाउन जाहीर होण्यापूर्वी सुद्धा देशाला हवाई साहसी क्रीडा क्षेत्रात इतिहासातील पाहिले सुवर्णपदक मिळवून देण्या पासून ते महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष व समन्वय समितीच्या माध्यमातून तुकडेबंदी सारखा सर्वसामान्य शेतकऱ्याचा व गुंठे धारकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न थेट मंत्रालय व हायकोर्ट पर्यंत नेऊन राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. त्याच बरोबर कोल्हार येथील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुद्धा मंत्री पातळीवर ढुस यांनी प्रयत्न केले असून येथील वाहतूक कोंडीचा प्रश तात्काळ मार्गी लावला आहे. त्याच बरोबर देवळाली ते राहुरी फॅक्टरी सारख्या स्थानिक रस्त्यांचे वर्षभर रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी मदत केली आहे. या आणि अश्या विविध सामाजिक कार्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे सरकारी यंत्रणेला आपत्ती व्यवस्थापन कामी सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे मत ढुस यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
या प्रसंगी ढुस यांनी सांगितले की, जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या हॅम रेडीओ ऑपरेटर्सची आपत्ती व्यवस्थापन कामात मदत होणेसाठी हॅम रेडिओ च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व हॅम ऑपरेटरची संवाद साखळी निर्माण केली जाईल. त्याद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुके हॅम रेडीओ लहरींच्या द्वारे जिल्ह्याला जोडण्याचे काम करण्याला प्रथम प्राधान्य राहील, जेणेकरून जिल्ह्यातील दूरध्वनी व इतर संपर्क यंत्रणा जर काही कारणास्तव कोलमडून पडली तर हॅम रेडीओ सारखी समांतर यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध असेल व आपत्कालीन परिस्थितीत सर्व तालुक्यांचा जिल्ह्यासी व जगाशी संपर्क कायम राहील.
कोरोना सारख्या महाभयंकर आपत्ती मध्ये शासनाच्या सोबत राहून काम करण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध करून दिल्याबद्द आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचे आभार व्यक्त केले.
-आप्पासाहेब भिमराज ढुस,
देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहमदनगर. मो. 9823035936


