shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

येवला तालुक्यात लॉकडाऊनचे बंधन न पाळणाऱ्यांवर पोलिसांनी केली कारवाई


येवला | प्रतिनिधी- (संतोष राउळ):
     नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आज दि. 21/04/2020 रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नाशिक जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रासाठी आदेश पारीत केला कि भाजीपाला, फळे, किराणा आणि इतर जीवनावश्य वस्तूंची  दुकाने उघडणे आणि विक्री करणे यासाठी स. 10.00 ते दु. 4.00 या वेळेचे बंधन केले आहे. या वेळेतून वैद्यकीय सेवा तसेच मेडिकल स्टोअर्स वगळण्यात आले आहे.  
      



असे असून देखील येवला तालुक्यात काही भाजीपाला व  किराणा विक्रेते तसेच स्थानिक नागरिकांनी या वेळेचे बंधन न पाळल्या मुळे तसेच अकारण मोटरसायकल व मोठी वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर व बंधन पाळणार्यावर आज येवला तालुका शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. कोळी साहेब यांच्या उपस्थितीत शहरातील विंचूर चौफुली, फत्तेबुरुज नाका, गंगादरवाजा भाग तसेच औरंगाबाद रोड या ठिकाणी पोलिसांनी योग्य ती कारवाई करून नागरिकांना या बाबतीत समज दिली.
close