बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )
रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे येथील स्व. शाहीर पांडूरंग अधिकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य केले जात आहे.
देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोरोना मुक्तीसाठी शासनाने संपूर्ण देशात लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी काळात ग्रामीण भागातील गरीब गरजू जनतेचे कोणत्याही प्रकारे हाल होवू नये म्हणून शासनाच्या माध्यमातून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
कोरोना व्हायरसच्या माध्यमातून राष्ट्रावर आलेल्या या जैविक संकटाचा मोठ्या धैर्याने सामना करण्यासाठी शासनाला सर्वार्थाने मदत करण्यासाठी समाजातील अनेक राष्ट्रप्रेमी दानशूर व्यक्ती, उद्योजक सामाजिक, धार्मिक संघटना स्वेच्छेने मदतीचा हात घेऊन पुढे सरसावल्या आहेत. कोरोना मुक्तीच्या या राष्ट्रीय लढाई साठी समाजातील सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे येथील स्व.शाहीर पांडूरंग अधिकारी सेवाभावी संस्था पेण /तळे माणगांव रायगड या संस्थेच्या वतीने पेण तर्फे तळे ग्रामपंचायत हद्दीतील आमडोशी,बोरघर, पेण या तीन गावातील अत्यंत गरीब गरजू कुटुंबाना जीवनावश्क वस्तू चे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बालाजी कालप.श्री. सदानंद अधिकारी, श्री साईनाथ पेणकर,रोहित मोरे, जितेंद्र मोंडे,मधुकर कदम यांनी गरजू कुटुंबात वाटप केले.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व सभासद हितचिंतक यांनी अनमोल सहकार्य केले.तसेच पेण गावचे दुकानदार श्री. हसमुख भाई मेथा.याचे खूप सहकार्य लाभले.


