पणजी : वृत्तसंस्था –
कोरोनावर जगभर संशोधन सुरु आहे पण औषध सापडलेलं नाही. अनेक संस्था आणि शास्त्रज्ञांनी लस शोधल्याचा दावा केला असून त्याची परीक्षणं सुरु आहेत. त्याचे अंतिम निकाल येण्यास अजून काही महिने जाणार आहेत. सगळं जग यावर औषध शोधत असतानाच गोव्यातल्या एका शिक्षकाने एक अजब दावा केला आहे. शेगावच्या संत गजानन महाराजांनी स्वप्नात दृष्टांत देऊन आपल्याला कोरोनचं आयुर्वेदिक औषध सांगितलं असा दावा त्यांनी केला आहे.
महेश देगवेकर असं या 55 वर्षीय शिक्षकाचं नाव असून आपण महाराजांचे निस्सीम भक्त असल्याचंही त्यांनी सांगितलं. या औषधाबद्दल त्यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाही पत्र लिहलं होतं. त्यानंतर नाईक यांनी त्यांची नुकतीच या शिक्षकाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली
देगवेकर यांनी IANSला दिलेल्या माहितीनुसार, लिंबू आणि आल्याचा रस, लसणाच्या काही पाकळ्या आणि करल्याचा रस मेथीच्या दाण्यांच्या पावडरमध्ये मिसळून औषध बनवता येईल. या औषधाचा परिणाम तीन दिवसात दिसून येतील. सहाव्या दिवशी कोरोना रुग्ण पूर्णपणे बरा होईल. सातव्या दिवशी ती व्यक्ती घरी जाऊ शकते, असा दावा देगवेकर यांनी केला आहे.
दरम्यान, आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या शिक्षकाने जो फॉर्म्युला सांगितला आहे तो वैज्ञानिकांना तपसण्यासाठी देण्यात आला असल्याचे सांगितले. ते म्हणाले, हा आयुर्वेदीक फॉर्म्युला आहे. कोरोनावर औषध सापडलेलं नाही त्यामुळे प्रतिकार शक्ती कशा पद्धतीने वाढवता येईल यावर जगभर विचार सुरु आहे. आयुर्वेदीक पद्धतीने त्यात सुधारणा करता येते. प्रतिकार शक्ती वाढवणारी काही औषधं आहेत. मात्र त्यांना वैज्ञानिक मान्यता मिळालेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
देगवेकर यांनी सांगितले की, ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि गायिका कनिका कपूर यांच्याबद्दलही महाराजांनी सांगितलं आहे. हे दोघही कोरोनापासून मुक्त होतील असं गजानन महाराजांनी त्यांना सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.